घरताज्या घडामोडीFarm Laws: शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार - चंद्रकांत पाटील

Farm Laws: शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार – चंद्रकांत पाटील

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशवासियांना संबोधित करताना तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मोठ्या निर्णयाची घोषणा केली. याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे.’

नेमके चंद्रकांत पाटील काय म्हणाले? 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपल्याला असे वाटते की, तीन कृषी कायद्यांमुळे शेतीमालाला चांगला भाव मिळणार होता आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख येणार होते. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यातील प्रत्येकी छोट्या भागातील शेतकऱ्यांच्या गटांनी या कायद्यांना विरोध केला तरी बाकी संपूर्ण देशात शेतकरी आणि त्यांच्या संघटनांना हे कायदे मान्य होते. एका छोट्या समूहाला कायद्यांचे महत्त्व पटवून देण्यात अपयश आले. एक विशिष्ट गट संपूर्ण देशभर या विषयावरून अस्वस्थता निर्माण करत होता. सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतरही या शेतकऱ्यांचे आंदोलन चालू राहिले. अखेरीस कायदे मागे घेण्याचा निर्णय झाला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे कसे आहेत, हे पुन्हा एकदा समजाऊन सांगून ते अंमलात आणावेत.

- Advertisement -

पुढील चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीसोबतच बाहेर हवे तेथे माल विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार होते. त्यामुळे स्पर्धा वाढून त्याला चांगला भाव मिळणार असताना त्याला विरोध करण्यासारखे काहीही नव्हते. कंत्राटी शेतीमुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो आणि अशी शेती राज्यात अनेक ठिकाणी यापूर्वीच राबविली जात आहे.’


हेही वाचा – Farm Laws: आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा झाला विजय – सोनिया गांधी

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -