घरताज्या घडामोडीCorona Virus: पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोना, ओमिक्रॉनची शक्यता

Corona Virus: पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोना, ओमिक्रॉनची शक्यता

Subscribe

भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला असून त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु काळजी घेण्याचे काही कारण नसून त्या सध्या मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन झाल्या आहेत. राहत्या निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. तिसऱ्या लाटेचे संकेत असल्याप्रमाणे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु यामध्ये सर्वाधिक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील ५ मंत्री आणि १०आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच यानंतर आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे यांच्यासह त्यांच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांनी अद्याप कोरोनाची लागण झाल्याबाबतची माहिती दिली आहे.

- Advertisement -


पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून सभा, गर्दी आणि लग्न सोहळ्याला उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी त्या कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान पंकजा मुंडे यांना यापूर्वीही कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी स्वतः ट्वीट करत २१ एप्रिल २०२१ रोजी पहिल्यांदा कोरोना झाला असल्याची माहिती दिली होती.

- Advertisement -


हेही वाचा : corona Virus : नेतेच ठरताहेत सुपर स्प्रेडर

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -