घरताज्या घडामोडीMaharashtra Corona Update: राज्यातील आज नव्या कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार पार!; ६...

Maharashtra Corona Update: राज्यातील आज नव्या कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार पार!; ६ ओमिक्रॉनबाधित आढळले

Subscribe

राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६६ लाख ८७ हजार ९९१वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १ लाख ४१ हजार ५३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे सातत्याने नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढत होताना दिसत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ९ हजार १७० नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात १ हजार ४४५ रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. तसेच राज्यात आज ६ नव्या ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या ४६०वर पोहोचली आहे.

राज्यातील आता सक्रीय रुग्णांची संख्या ९ हजार १७० झाली आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६६ लाख ८७ हजार ९९१वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १ लाख ४१ हजार ५३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६५ लाख १० हजार ५४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३५ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या ६ कोटी ९१ लाख ३६ हजार ६४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख ८७ हजार ९९१ (९.६७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख २६ हजार १ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत, तर १०६४ व्यक्ती सांस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ६ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३ पुणे ग्रामीण, २ पिंपरी चिंचवड, १ पुणे मनपा येथील आहेत. मुंबई, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे ओमिक्रॉनबाधित सर्वाधिक आहेत. मुंबईत ३२७ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ४६० ओमिक्रॉनबाधितांपैकी १८० रुग्णांना निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.


हेही वाचा – Coronavirus: सावधान! राज्यात तिसऱ्या लाटेत ८० हजार मृत्यू होण्याची शक्यता!

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -