घरमहाराष्ट्ररोहित पवारांच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान!

रोहित पवारांच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधाच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

२०१९साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेलेले राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्या आमदारकीला आव्हान देण्यात आलं आहे. त्यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये रोहित पवार यांच्यावर अनेक आरोप देखील करण्यात आले आहेत. त्यासंदर्भात आता न्यायालयानं रोहित पवार यांना समन्स बजावले आहेत. यासंदर्भात रोहित पवार यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी १३ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ही याचिका भाजप नेते आणि राज्याचे माजी मंत्री राम शिंदे यांनी दाखल केली आहे.

पैसे वाटल्याचा राम शिंदेंचा आरोप

रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र, याच निवडणुकीत राम शिंदे रोहित पवार यांच्याविरोधात पराभूत झाले होते. त्यानंतर राम शिंदेंनी आता रोहित पवार यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. निवडणूक काळात रोहित पवार यांनी चुकीच्या मार्गांचा वापर करून निवडणूक जिंकली असा आरोप राम शिंदेंनी केला आहे. त्यांच्या साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकरवी रोहित पवार यांनी मतदारांना पैशांचं वाटप केलं असा दावा देखील या याचिकेमध्ये राम शिंदेंनी केला आहे.

- Advertisement -

४३ हजारांच्या मताधिक्याने विजय

राम शिंदे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातले विद्यमान आमदार होते. मात्र, रोहित पवार यांनी राम शिंदेंचा दणदणीत पराभव केला आहे. या निवडणुकीत राम शिंदे यांना ९२ हजार ४७७ मतं मिळाली होती, तर रोहित पवार यांना १ लाख ३५ हजार मतं मिळाली होती. त्यामुळे तब्बसल ४३ हजार मतांनी रोहित पवार विजयी झाले होते.


हेही वाचा – लोकसभेला महाविकास आघाडी झाल्यास पवार पंतप्रधान होतील-रोहित पवार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -