घरताज्या घडामोडीअनधिकृत बांधकाम रोखल्याने, दहिसरच्या नदीचा प्रवाह मोकळा

अनधिकृत बांधकाम रोखल्याने, दहिसरच्या नदीचा प्रवाह मोकळा

Subscribe

नदीच्या पात्रालगत असणाऱ्या अनधिकृत ९५ झोपड्यांवर कारवाई करून नदीच्या पात्रातील विकासासह, पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.

दहिसर येथील नदीचे रुंदीकरण व खोली करून नदीचे पुनर्रज्जीवन करण्यात येत आहे. या नदीच्या पात्रालगत असणाऱ्या अनधिकृत ९५ झोपड्यांवर कारवाई करून नदीच्या पात्रातील विकासासह, पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. बोरीवली भागातील नदीच्या पात्रातील अतिक्रमणांमुळे या नदीचा विकास आता पर्यंत रोखला गेला होता.बोरीवली पूर्व येथील सुधीर फडके उड्डाणपुलाखालील असणारी ९५ अनधिकृत बांधकामे ही नदीची साफसफाई करण्यात अडथळा ठरत होती, यांवर गेली अनेक वर्षे कारवाई होत नव्हती; तेथील स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे या कारवाईत अडचणी निर्माण होत असल्याने ही कारवाई आतापर्यंत प्रलंबित होती. यासाठी आर मध्य विभागाच्या अधिकार्‍यांमार्फत या सर्व झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या झोपड्यांच्या कागदपत्रांची पडताळणी नंतर पात्र कुटुंबियांना मिरा-भाईंदर येथे पर्यायी सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

एकूण ७३८ फुट लांबीची संरक्षक भिंत बांधण्यात येणार

दहिसर आणि बोरीवली येथील नदीलगतच्या स्थानिकां विरोध लक्षात घेऊन, कारवाई करताना मुंबई पोलिसातील तब्बल १५० कर्मचार्‍यांचा ताफा मागवण्यात आला होता. तसेच मुंबई महानगरपालिकेचे १९० कामगार कर्मचारी अधिकारी घटनास्थळी हजर होते. पोलिसांच्या मंगळवारी करण्यात आलेल्या या कारवाईची माहिती सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी सांगितले. या नदीकिनारी एकूण ७३८ फुट लांबीची संरक्षक भिंत बांधण्यात येणार असून या आधी बोरीवली परिसरात ३७७ फुटांची भिंत बांधण्यात आली होती. या परिसरातील अधिकृत झोपडपट्टया हटवण्यात आल्याने आता नदीच्या पाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भातील काम लवकरच सुरू केले जाईल असे सहाय्यक आयुक्तांनी सांगितले आहे.

- Advertisement -

प्रथमच ड्रोनचा वापर

स्थानिकांचा विरोध लक्षात घेता, त्यांच्याकडून दगडफेक होण्याची भीती लक्षात घेऊन महापालिकेच्यावतीने प्रथमच ड्रोनचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून जमावाच्या प्रत्येकाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -