घरताज्या घडामोडीशिवसेना सत्तेसाठी काय करते ते पाहतोय, देवेंद्र फडणवीसांची एमआयएमच्या ऑफरवर प्रतिक्रिया

शिवसेना सत्तेसाठी काय करते ते पाहतोय, देवेंद्र फडणवीसांची एमआयएमच्या ऑफरवर प्रतिक्रिया

Subscribe

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणून स्वीकारले आहे,आजानची स्पर्धा घेऊ लागले आहेत. युतीचा प्रकार त्याचा परिणाम असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारला एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी एकत्र येण्याची खुली ऑफर दिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्ही जायला तयार आहोत. आम्ही भाजपची बी टीम नाही हे सिद्ध करण्यासाठी आम्ही एकत्र येण्यास तयार असल्याचे जलील म्हणाले आहेत. यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. तर आता सत्तेसाठी शिवसेनेची काय भूमिका असेल हे आम्हाला पाहायचं असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कितीही एकत्र आले तरी भाजप निवडून येणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला एमआयएमच्या आलेल्या ऑफरवर प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी आणि एआयएमआयएम एकत्र आले तरी भाजपला काही फरक पडणार नाही. महाराष्ट्रातील जनता भाजपच्या पाठीशी आहे. ते सर्व एकत्रित आले तरी ते शेवटी सर्व एकच आहेत. भाजपला हरवण्यासाठी सर्व एकत्र आले आहेत. परंतु भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे जनता मोदींनाच निवडून देईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

- Advertisement -

खासदार इम्तियाज जलील यांच्या खुल्या ऑफरनंतर शिवसेना काय करणार हे आम्हाला पाहायचे आहे. यांचा पराभव झाला तर यांना ईव्हीएम दिसते, बी टीम, सी टीम आणि झेड टीम दिसते, पराभव झाल्यानंतर टीका करत असतात. त्यामुळे आता शिवसेना काय करणार हे आम्हाला पाहायचे आहे.

बाळासाहेबांना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणून स्वीकारले

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणून स्वीकारले आहे. आजानची स्पर्धा घेऊ लागले आहेत. युतीचा प्रकार त्याचा परिणाम असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

- Advertisement -

राजू शेट्टींशी चर्चा नाही

राजू शेट्टी यांच्या नाराजीबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर फडणवीस म्हणाले की, राजू शेट्टी यांच्याशी माझी चर्चा झाली नाही. राजू शेट्टी आमच्यासोबत होते परंतु ते काही कारणामुळे पलीकडे गेले. कोण आमच्यासोबत येणार हे प्रत्यक्ष कळल्याशिवाय त्यावर बोलणं योग्य नाही. परंतु जो कोणी शेतकरी नेता असेल त्यांनी जर मागे वळून पाहिले तर मोदींनी शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय़ घेतले आहेत. साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादकांच्या हिताचे निर्णय मोदींनी घेतले ते इतर कोणी घेतले नाही याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे असे फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : ‘मविआ’ला फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी; MIM युती प्रस्तावावर नितेश राणेंचे टीकास्त्र

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -