घरमनोरंजन'तोरबाज' दिग्दर्शक गिरीश मलिकवर कोसळला दु:खाचा डोंगर; 17 वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू

‘तोरबाज’ दिग्दर्शक गिरीश मलिकवर कोसळला दु:खाचा डोंगर; 17 वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू

Subscribe

होळीनिमित्त देशभरात उत्साहाचे, आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र ‘तोरबाज’ चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मलिक यांच्या घरी एक दु:खद घटना घडली आहे. संजय दत्त स्टारर ‘तोरबाज’ चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मलिक यांच्या पोटच्या मुलाचा घराच्या पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. होळीच्या दिवशी त्यांचा 17 वर्षांचा मुलगा मनन याने आपला जीव गमावला आहे. मात्र त्याने स्वत: इमारतीवरून उडी मारली की अन्य काही दुर्घटना घडली याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

या घटनेनंतर मननला तातडीने उपचारांसाठी कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तिथेच त्याचा मृत्यू झाला. रिपोर्टनुसार, अंधेरी वेस्टमधील ओबेरॉय स्प्रिंग्स इमारतीमध्ये ही घटना घडली असून याच इमारतीच्या ए विंगमध्ये दिग्दर्शक गिरीश मलिक यांचे कुटुंब राहते. मनन दुपारी होळी खेळून घरी परत आला त्यानंतर ही दुर्घटना घडली आहे. सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली आहे. गिरीश मलिक यांचे पार्टनर पुनीत सिंग यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

पुनीत सिंग म्हणाले की, ‘मिस्टर मलिकचा मुलगा आता राहिला नाही, पण सध्या मी काही सांगू शकत नाही, हे कसे घडले, आम्ही बोलण्याच्या स्थितीत नाही.’ संजय दत्तने याबद्दल दु:ख व्यक्त केले असून गिरीशच्या कुटुंबीयांना संवेदना व्यक्त केल्या आहेत.

‘तोरबाज’चे निर्माते राहुल मित्रा यांनी मननच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करताना म्हटले- ‘अपघाताची बातमी ऐकून माझ्या नशाचं काम करणं बंद झाल्या. मी फक्त संजू (संजय दत्त)ला सांगितले आहे. तेही दु:खात आहेत. हे दु:ख व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. तोरबाज बनवताना मी मननला भेटलो, तो खूप हुशार आणि कर्तबगार मुलगा होता. ईश्वर गिरीश आणि त्यांच्या कुटुंबीयांना यावेळी धीर देवो.


Kapil Sharma बनला डिलिव्हरी बॉय; चाहते म्हणतायत ‘ह्याच्यावर अक्षय कुमारचा प्रभाव दिसतोय’

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -