घरमहाराष्ट्र'रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात'; पवारांच्या दिल्ली बैठकांवरुन पडळकरांची टीका

‘रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात’; पवारांच्या दिल्ली बैठकांवरुन पडळकरांची टीका

Subscribe

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. पडळकरांनी शरद पवारांच्या दिल्लीच्या बैठकांची खिल्ली उडवली आहे. मला दिल्लीचं राजकारण कळत नाही, पण कोंबड्याला काय वाटतं मी आरवल्याशिवाय उजाडतच नाही. असे काही कोंबडे एकत्र आले होते, त्यांनी बैठका घेतल्या. यांची अवस्था ही रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात, अशी झाली आहे, अशी जहरी टीका पडळकरांनी शरद पवार यांच्यावर केली. ते सोलापूर येथील श्रमिक पत्रकार संघात बोलत होते.

मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत, त्यांना पुढील ३० वर्षांच्या भावी पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा. रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात, त्यामुळं पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा, असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी शरद पवार यांच्या बैठकांची खिल्ली उडवली. तसंच, शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे, असं देखील पडळकर म्हणाले.

- Advertisement -

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डीएनए बहुजन विरोधी

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने आरक्षणा विरोधात याचिका दाखल केली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून समाजा- समाजमध्ये तेढ वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. मूठभर लोक बहुजनांचा आवाज दाबत आहेत. ओबीसींना दिलेले संविधानिक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न करत आहेत. ओबीसीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -