घरताज्या घडामोडीनागपूर रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ बॉम्ब सदृश्य वस्तू; परिसरात एकच खळबळ

नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ बॉम्ब सदृश्य वस्तू; परिसरात एकच खळबळ

Subscribe

नागपूर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेश दाराजवळ असलेल्या ट्रॅफिक पोलीस चौकीच्या मागे जिवंत बॉम्ब सदृश वस्तू सापडली आहे. बॉम्ब शोधक पथक म्हणजेच बीडीडीएसने ती बॉम्ब सदृश वस्तू ताब्यात घेऊन डिफ्युज करण्यासाठी नेली आहे.

नागपूर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेश दाराजवळ असलेल्या ट्रॅफिक पोलीस चौकीच्या मागे जिवंत बॉम्ब सदृश वस्तू सापडली आहे. बॉम्ब शोधक पथक म्हणजेच बीडीडीएसने ती बॉम्ब सदृश वस्तू ताब्यात घेऊन डिफ्युज करण्यासाठी नेली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही वस्तू या ठिकाणी कोणी ठेवली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलीस या घटनेचा तपास करत असून सीसीटीव्हीच्या आधारे ही वस्तू ठेवणाऱ्याचा शोध सुरू आहे.

बॉम्ब सदृश वस्तूमध्ये एक छोटे डेटोनेटर आणि लो इंटेनसीटीच्या स्फोटकांचा 55 छोट्या कांड्या एकमेकांशी सर्किट ने जोडलेल्या स्वरूपात असल्याची माहिती समोर येत आहे. बीडीडीएसला प्राथमिक दृष्ट्या ते जिवंत बॉम्ब सारखे वाटल्यामुळे सध्या ती बॉम्ब सदृश वस्तू रेल्वे स्टेशनच्या परिसरातून ताब्यात घेऊन बीडीडीएस च्या खास गाडीमध्ये नेण्यात आली आहे.

- Advertisement -

संध्याकाळी 7 वाजताच्या नंतरच्या सुमारास ही बॉम्ब सदृश वस्तू रेल्वे स्टेशनच्या मुख्य दारा जवळील ट्राफिक पोलीस चौकीच्या मागे तार ने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर आधी पोलिसांनी त्याची पाहणी केली, ती वस्तू इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या स्वरूपात असल्याने पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले.

बॉम्ब सदृश वस्तू सापडल्याने मुख्य दारावर तसेच मुख्य दाराच्या समोरील रस्त्यावरील वाहतूक काही वेळासाठी बंद करण्यात आली. बॉम्ब शोधक पथकाने ते ताब्यात घेऊन गेले. दरम्यान डेटोनेटर आणि त्यासोबत सर्किटने जोडलेल्या त्या कांड्या किती घातक होत्या हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Asani Cyclone : ओडिसा-आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीला धडकणार असनी चक्रीवादळ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -