घरताज्या घडामोडीPDF स्वरुपात मुलांपर्यंत पुस्तके उपलब्ध करुन देणार - शिक्षणमंत्री

PDF स्वरुपात मुलांपर्यंत पुस्तके उपलब्ध करुन देणार – शिक्षणमंत्री

Subscribe

राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीचा अवलंब न करता इतर पर्यायांचा देखील विचार करत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

राज्यात ऑनलाइन शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची खबरदारी घेत ऑफलाइन शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात मुले युट्यूब,गुगल,व्हॉट्स अँपच्या माध्यामातून मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांना PDF स्वरुपात मुलांपर्यंत पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Books available to children in PDF format – Education Minister Varsha Gaikwad) आज झालेल्या चर्चेत कोरोनाच्या संपूर्ण परिस्थिती आढावा घेऊन मुलांच्या शिक्षणाबाबत विचार करत आहोत. संपूर्ण परिस्थितीचा आढवा घेऊन ऑफलाईन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीचा अवलंब न करता इतर पर्यायांचा देखील विचार करत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. सह्याद्री वाहिनीवरही विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रेडिओवरही शैक्षणिक कार्यक्रम सुरु आहेत. अशाप्रकारे विविध माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यासाठी संपूर्ण वर्षभराचे शेड्यूल तयार करण्यात आहे. मागील वर्षात जे व्यवस्थापन नव्हते तेही यावेळी करण्यात आल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

- Advertisement -

विद्यार्थ्यांची सहा महिन्यांची परीक्षा कशी होईल याबाबत येत्या काळात कळवण्यात येणार आहे. येत्या काळात आरोग्य विभागाशी चर्चे करुन परिस्थिती आटोक्यात येत असेल तर शाळा सुरु करण्यासाठी काही हरकत नसेल. परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या १५ दिवसात निर्णय घेऊ, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – राज्यपालांकडेच आहे ‘ती’ १२ सदस्यांची यादी, सुनावणी दरम्यान उघड

- Advertisement -

 

 

 

 

 

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -