घरमहाराष्ट्रगोरक्षकांना बेदम मारहाण

गोरक्षकांना बेदम मारहाण

Subscribe

गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्यांचा पाठलाग केल्याने गोरक्षकांना बेदम मारहाण करण्यात आली असून या प्रकरणात ६२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

काँग्रेस नगरसेवकासह ६२ जणांवर गुन्हे दाखल

गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाचा पाठलाग करतात म्हणून संगमनेरमधील तीन गोरक्षकांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावर खांडगाव फाटा येथे घडली. या गोरक्षकांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मारहाण झाली. हा प्रकार मंगळवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडला असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात संगमनेर नगरपालिकेच्या एका काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकासह सुमारे ६२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आशुतोष शरद भुजबळ हा गोरक्षक आहे. तो व त्यांचे दोन मित्र हे पुणे-नाशिक महामार्गाहून संगमनेरकडे येत होते. त्यावेळी तेथून जात असलेल्या एका चारचाकी वाहनातून गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याच्या संशय त्याला आला. त्यांनी वाहनचालकास विचारणा केली. त्यावेळी चालकाने भुजबळ याला मारहाण करत त्याच वाहनातून भुजबळ याला मौलाना आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागे नेले व तेथे जबर मारहाण केली.

या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात भुजबळ याने दिलेल्या तक्रारीवरून काँग्रेस पक्षाचे नगरसेवक रिजवान शेख, यांच्यासह जाकीर अन्वर कुरेशी, नवाज अन्वर कुरेशी, सुफीयान नशीर कुरेशी, अजमल लतीफ कुरेशी, लाला रजाक कुरेशी, तैसीफ आसिफ कुरेशी, हुजेफ आदीक कुरेशी, सोहेल फैरोज कुरेशी, जफर उमर कुरेशी, कासीफ असद कुरेशी, वाहिद अब्दुल करीम कुरेशी अशा एकूण ६२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -