घरताज्या घडामोडीमुंबईला ओरबाडण्याचा केंद्र सरकार आणि भाजपचा डाव, संजय राऊतांची बजेटवरुन टीका

मुंबईला ओरबाडण्याचा केंद्र सरकार आणि भाजपचा डाव, संजय राऊतांची बजेटवरुन टीका

Subscribe

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असल्याचे पाहावत नाही आहे. भाजपच्या मुंबईतील्या नेत्यांची यावर काय भूमिका आहे. काय मत आहे हे स्पष्ट झाल्याशिवाय अधिक मत स्पष्ट करणार नाही असे संजय राऊत म्हणाले आहेत.

केंद्र सरकारने संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबईसाठी केंद्राने दुर्लक्ष केले असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. भाजप आणि केंद्र सरकार मुंबईला ओरबाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईतील महत्त्वाचे उद्योग पळवण्याचे काम सुरु आहेत. अर्थसंकल्पात प्रत्येकवेळी महाराष्ट्रावर आणि मुंबईवर अन्याय का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर टीक केली आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेवर भाजप सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यावरही संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. ज्यांना मुंबईवरील शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे तो उतरवायचा आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असल्याचे पाहावत नाही आहे. भाजपच्या मुंबईतील्या नेत्यांची यावर काय भूमिका आहे. काय मत आहे हे स्पष्ट झाल्याशिवाय अधिक मत स्पष्ट करणार नाही असे संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

मुंबईला ओरबाडण्याचा प्रयत्न

पण काँग्रेसच्या राजवटीत कधी झाले नाही त्यापेक्षा जास्त ताकदीने मुंबईला ओरबाडण्याचा आणि महत्त्वाचे उद्योग पळवण्याचा, मुंबईतील आर्थिक प्रकल्प आणि योजना गाडण्याचे काम झाले आहे. एखाद्या राज्याचा विकास झाला म्हणून आमच्या पोटात दुखायचे कारण नाही, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार असेल ही देशाची राज्ये आहेत. प्रत्येक राज्याचा विकास व्हावा अशी आमची भूमिका आहे. पण ते करत असताना मुंबईचा अपमान करणं आणि कमी लेखणं किती योग्य आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबईचे पैसे परत द्या तुम्ही तुमच्या पैशाने विकास करा

महाराष्ट्र आणि मुंबईच्याबाबत बजेटमध्ये तोंडाला पान पुसणे हा सौम्य शब्द झाला आहे. त्याही पलिकडे महाराष्ट्राच्या मुंबईच्या छातीवर उभे राहून, मुंबई देशाला सव्वा दोन लाख कोटी रुपये देत आहे. मुंबईचे पैसे परत द्या तुम्ही तुमच्या पैशाने विकास करा, आमचा खिसा कापून कशासाठी बाजीरावगिरी करत आहात. आम्ही आमचे कर्तव्य मानतो, राष्ट्रहितासाठी आम्ही नेहमीच त्याग केलाय त्याबाबत काय म्हणायचे नाही. पण प्रत्येकवेळी महाराष्ट्राच्या राजधानीवर अन्याय का? अशावेळी इतर राजकीय पक्ष मुंबईवर ताबा मिळवायचा आहे. ज्यांना शिवसेनेच्या ताब्यातून मुंबई हिसकावून घ्यायची आहे का? उरलेली मुंबईची प्रतिष्ठा ओरबडून घ्यायची का हे स्पष्ट होत आहे.

- Advertisement -

मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला बजेटमध्ये कधीच दिलासा मिळत नाही. फक्त वरवरचा देखावा आणि भ्रम निर्माण केला जातो. सरकारच्या दृष्टिने जे पाच ते सहा उद्योगपती आहेत तेच मध्यमवर्गीय आहेत. त्यांना अधिक श्रीमंत कसे करता येईल यासाठी सरकारचे बजेट आहे. असे संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा : Raj Thackeray : राज ठाकरे ॲक्शन मोडवर, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -