घरक्राइमभागीदाराला धमकावून त्याचा हिस्सा लाटला

भागीदाराला धमकावून त्याचा हिस्सा लाटला

Subscribe

विष्णू नगर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल

डोंबिवली : डोंबिवलीत एका जागेवर इमारत बांधण्यासाठी तीन बिल्डर एकत्र आले. मात्र लालसेपोटी चक्क दोन बिल्डरने त्यांच्या भागिदराला धमकावून त्याचा हिस्सा लाटल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवली पश्चिमेत उघडकीस आला आहे . याप्रकरणी पीडित भागीदाराने विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी दीपक सावलानी उर्फ दिपू शेठ उर्फ दीपक सावलानी , संजय निक्ते , सर्वेश राऊत यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीने दिलेल्या जबाबानुसार डोंबिवली पश्चिमेकडील गावदेवी परिसरात विनोद म्हात्रे यांनी एक जमीन विकसित करण्यासाठी घेतली होती. मात्र आर्थिक अडचणींमुळे त्यांनी दीपक सावलानी, संजय नीक्ते,सर्वेश राऊत यांच्या बालाजी क्रिस्टल या संस्थेसोबत भागीदार करार करत ही जमीन विकसित करण्याचा निर्णय घेत करारनामा देखील केला . विनोद म्हात्रे यांना या प्रकल्पात ३० टक्के मोबदला देण्यात येणार होता. याच काळात विनोद यांनी या जमिनी लागत असलेल्या एका जमिनीवर महापालिकेची बांधकाम परवानगी घेऊन एका इमारतीचे बांधकाम केले. यादरम्यान दीपक सावलानी व संजय निकते यांनी विनोद मात्रे यांना ३० टक्के भागीदारीपैकी दहा टक्के भागीदारी सर्वेश राऊत यांना सोडण्यास सांगितले. विनोद म्हात्रे यांनी देखील ही अट मान्य करत १० टक्के भागीदारी सोडली.

- Advertisement -

मात्र त्यानंतर दीपक सावलानी, संजय निक्ते व सर्वेश राऊत यांनी विनोद म्हात्रे यांना तुझी पूर्वी बांधलेली इमारत अनधिकृत घोषित करून तोडायला लावू अशा धमक्या देत उर्वरित २० टक्के भागीदारी देखील विनामोबदला सोड असे धमकावले .उर्वरित २० टक्के भागीदारी सोडली नाही तर तुझ्या इमारतीवर महापालिकेकडून कारवाई करायला लावू व तुला मारू अशी धमकी दिली.

फिर्यादी विनोद मात्रे यांनी आरोप केला आहे की, उपरोक्त तिन्ही आरोपी व त्यांच्या साथीदारांनी साइटवर जावून आपल्यावर हल्ला करण्याची योजना आखली होती परंतु आपण त्या दिवशी साइटवर उपस्थित नसल्यामुळे त्यांचा कट फसला .याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यात पेन ड्राईव्ह द्वारे जमा केले आहे. या गंभीर प्रकरणी विनोद म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विष्णू नगर पोलिसांनी दीपक सावलानी, संजय निक्ते, सर्वेश राऊत यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर खंडणी व मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -