घरताज्या घडामोडीआमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल, सोलापुरातील लग्न सोहळ्यातील गर्दीप्रकरणी...

आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल, सोलापुरातील लग्न सोहळ्यातील गर्दीप्रकरणी कारवाई

Subscribe

लग्न सोहळ्याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर आयोजकावर गुन्हा दाखल

राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळे, आणि धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांना केराची टोपली दाखवत सोलापुरात आमदार राजेंद्र राऊत यांनी मुलांचं मोठ्या थाटामाटात लग्न केल या लग्नाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे. राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र राऊत यांच्या मुलांच्या लग्नाला काही राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. सोशल मीडियावर या लग्न सोहळ्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

राज्यात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. सोलापुरात कोरोना रुग्णांची संख्याही अधिक आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आल्यामुळे सोलापुरात दुपारी ४ नंतर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. असे असतानाही आमदार राजेंद्र राऊत यांनी मोठ्या थाटामाटात मुलांचे लग्न केलं आहे. आमदार राऊत यांची मुलं रणजीत आणि रणवीर यांचा विवाह रविवारी संध्याकाळी ६.४५ वाजता मोठ्या धुमधडाक्यात पार पडला या विवाहाला मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये काही राजकीय मंडळीही उपस्थित होती.

- Advertisement -

राजेंद्र राऊत यांच्या मुलांच्या लग्नामध्ये जास्त लोकांना जमवून कोरोना नियमांना पायदळी तुडवण्यात आले आहेत. हजारोंच्या संख्येने लोकं उपस्थित राहिले असून कोणाच्याही चेहऱ्यावर मास्क दिसला नाही. तसेच समाजिक अंतराचाही फज्जा उडाला होता. या लग्न सोहळ्याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला परंतू पोलिसांनी आता राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.

भाजप नेत्यांची उपस्थिती

आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलांच्या लग्नाला भाजप नेत्यांनीही उपस्थिती लावली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार राम सातपुते, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान अवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील तसेच शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील या लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -