घरमहाराष्ट्रविनयभंग प्रकरणी डिआयजी निशिकांत मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

विनयभंग प्रकरणी डिआयजी निशिकांत मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

पुण्याच्या एम टी विभागात डीआयजी पदावर कार्यरत असलेले निशिकांत मोरे यांच्या विरोधात पोस्को अंतर्गत तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलीचे आई-वडिल पहिल्यांदा तळोजा आणि खारघर पोलीस ठाण्यात गेले तेव्हा पोलिसांकडून मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला नाही. अखेर पीडितीच्या आई-वडिलांनी खारघरमध्ये पत्रकार परिषद घेतली तेव्हा तक्रार दाखल केली गेली. याप्रकरणी अखेर डिआयजी निशिकांत मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

पीडित मुलीचे वडील हे विकसक आहेत. त्यांची आठ वर्षांपूर्वी निशिकांत मोरे यांच्यासोबत भेट झाली होती. तेव्हापासून त्यांचे एकमेकांशी चांगले संबंध होते. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मुलीच्या वडिलांकडून मोरे यांनी काही गाळे विकत घेतले होते. मात्र, त्यांनी पैसे अपूर्ण दिले. मोरेंनी पूर्ण पैसे न दिल्यामुळे ऑगस्ट महिन्यात पीडितीच्या वडिलांनी पोलिसांत लेखी तक्रार केली होती. त्याअगोदर जून महिन्यात पीडित तरुणीच्या वाढदिवसी मोरे आमंत्रण नसताना त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी केक कापून मुलीच्या अंगावर आणि शरीरावर केक लावून अश्लील कृत्य केल्याचे निदर्शनास आले असल्याचे पीडितीच्या आई-वडिलांनी सांगितले. सुरुवातीला पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याचा आरोप पीडितेच्या आई-वडिलांनी केला होता. मात्र, अखेर गुरुवारी संध्याकाळी निशिकांत मोरे यांच्या विरोधात पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -