घरताज्या घडामोडी'त्या' बातम्या खोट्या, दिशा सालियन प्रकरणी सीबीआयचा मोठा खुलासा

‘त्या’ बातम्या खोट्या, दिशा सालियन प्रकरणी सीबीआयचा मोठा खुलासा

Subscribe

दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून राजकारण तापलं असताना सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. दिशा सालियान प्रकरण सीबीआयने कधीही हाताळले नाही. तसंच हे प्रकरण सीबीआयकडे कधीही सोपवण्यात आलं नव्हतं, त्यामुळे यात कोणताही तपास केला नाही. या प्रकरणातील सीबीआयच्या निष्कर्षाबाबतच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे.

विधिमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा मुद्दा सभागृहात मांडला होता. तसेच हा तपास सीबीआयकडे नव्हता तर मुंबई पोलिसांकडे होता, असा खुलासा देखील केला होता. तसेच या प्रकरणी नव्याने चौकशी करण्याचे आदेशही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दिल्लीहून चौकशीचा अहवाल मागवून घेण्यात येणार आहे. तो पाहून पुढील चौकशीचे स्वरुप ठरवले जाईल, कोणाकडे अधिकचे पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत, असंही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत बोलताना, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तोच मुद्दा उचलून महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदारांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सभागृहात गदारोळ घातला होता. आमदार अमित साटम यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करत हे प्रकरण एसआयटीकडे देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं.

एका मुलीचा संशयास्पद मृत्यू होतो आणि त्याची चौकशी मुंबई पोलीस करतात. त्या चौकशीत दोनदा तपास अधिकारी बदलला जातो. ८ जूनच्या रात्री तिथे कोण उपस्थित होतं. कुणाच्या राजकीय दबावापोटी हे प्रकरण दडपण्यात आलं. दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे नसून मुंबई पोलिसांकडे ही केस आहे, असं आमदार नितेश राणे म्हणाले होते.

- Advertisement -

हेही वाचा : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -