घरमहाराष्ट्रअनिल देशमुखांना दिलासा नाहीच, 'ती' याचिका हायकोर्टाने फेटाळली

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली

Subscribe

1 एप्रिलला विशेष मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यांतर्गत (PMLA) न्यायालयाने एजन्सींना अनिल देशमुख, त्यांचे खासगी सचिव विजय पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना ताब्यात घेण्याची परवानगी दिली होती, या सर्वांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती.

मुंबईः राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांची याचिका ऐकण्यास मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा नकार दिलाय. CBI कोठडी देण्याच्या निर्णयाला अनिल देशमुखांनी हायकोर्टात आव्हान दिले होते, तीच याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावलीय. विशेष म्हणजे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरेंकडून याचिका दुसरीकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत. अनिल देशमुखांचे वकील दुपारी न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यापुढे पुन्हा याचिका मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली असता न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळत निकाली काढली. अनिल देशमुख यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीच्या संदर्भात सीबीआय ताब्यावरून विशेष न्यायालयाने दिलेल्या परवानगीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय. अनिल देशमुख यांनी सोमवारी अधिवक्ता अनिकेत निकम यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत सीबीआयच्या कोठडीच्या याचिकेलाही आव्हान दिले होते. अनिल देशमुख सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत.

- Advertisement -

1 एप्रिलला विशेष मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यांतर्गत (PMLA) न्यायालयाने एजन्सींना अनिल देशमुख, त्यांचे खासगी सचिव विजय पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना ताब्यात घेण्याची परवानगी दिली होती, या सर्वांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना आर्थर रोड जेलमधून अटक करण्यात आली होती, जिथे ते सध्या बंदिस्त आहेत. सीबीआयने पालांडे आणि शिंदे यांना ताब्यात घेतले, परंतु देशमुख यांना 30 मार्च रोजी तुरुंगात पडल्यानंतर खांद्याला दुखापत झाल्याने त्यांना ताब्यात घेता आले नाही, त्यानंतर 2 एप्रिलला उपचारासाठी त्यांना सर जे. जे. ग्रुपने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शासकीय रुग्णालयाने मंगळवारी दुपारी अनिल देशमुख यांना डिस्चार्ज देऊन पुन्हा कारागृहात पाठवले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या आधारे सीबीआयने 21 एप्रिल 2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवला.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

20 मार्च 2021 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केला होता की, देशमुख यांनी मुंबईतील रेस्टॉरंट्स आणि बारमधून दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे निर्देश सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंसह काही मुंबई पोलीस अधिकाऱ्यांना दिलेत. त्यानंतर ईडीने अनिल देशमुख, मुलगा हृषिकेश आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला. अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार सचिन वाझे यांनी मुंबई बार मालकांची बैठक बोलावली आणि पोलिसांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत त्यांच्याकडून 4.7 कोटी रुपये वसूल केले. वाझे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात कुंदन शिंदे यांना दोन हप्त्यांमध्ये खंडणीचे पैसे दिल्याचा खुलासा केला. गेल्या वर्षी 26 जून रोजी ईडीने शिंदे आणि देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे यांना अटक केली होती आणि 23 ऑगस्टला त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. वाझे हेही आरोपपत्रात आरोपी आहेत.


हेही वाचाः कारागृहात पडल्यानं अनिल देशमुखांच्या खांद्यावर जे.जे. रुग्णालयात होणार शस्रक्रिया

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -