घरताज्या घडामोडीलॉकडाऊनमध्येही रेल्वे दलालांनी हात धुऊन घेतले,अखेर हाती पडल्या बेड्या !

लॉकडाऊनमध्येही रेल्वे दलालांनी हात धुऊन घेतले,अखेर हाती पडल्या बेड्या !

Subscribe

लॉकडाउन आणि अनलॉक कालावधी दरम्यान मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याविरोधात कारवाई करत  एकूण ४४ दलालांना पकडण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यांत आलेल्या लांब पल्ल्याच्या विशेष रेल्वे गाड्यांचे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना पकडण्याकरिता रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. लॉकडाउन आणि अनलॉक कालावधी दरम्यान मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याविरोधात कारवाई करत एकूण ४४ दलालांना पकडण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ८ लाख ६२ हजार १९१ किंमतीची ४७९ लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली.

४४ रेल्वे तिकीट दलालांवर कारवाई 

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांचा काळाबाजाराचा धोका रोखण्यासाठी दलालांविरूद्ध मोहीम अधिक तीव्र केली.  रेल्वेने १२ मे २०२० पासून १५ जोड्या वातानुकूलित  विशेष गाड्या सुरू केल्या आणि त्यानंतर १ जून २०२० रोजी निवडक विशेष मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या १०० जोड्यांची घोषणा केली. अनेक  वैयक्तिक आयडी वापरुन ई-तिकिटे काढण्याची आणि या विशेष गाड्यांमध्ये आरक्षित जागा बळकावण्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या होत्या. दलालांविरूद्धच्या या मोहिमेत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने  सायबर सेल व इतर स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य रेल्वेच्या सर्व विभागांवरील  वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषतः खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या आवारात  छापेमारी केली. लॉकडाउन  आणि अनलॉक कालावधी दरम्यानच्या या छाप्यांत सर्व मिळून ४४ दलालांना पकडण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ८ लाख ६२ हजार १९१ किंमतीची ४७९ लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली.

- Advertisement -

मुंबई विभागात मोठी कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत या लॉकडाऊन व अनलॉकच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने मुंबई विभागात २२ दलाल पकडले व त्यांच्याकडून  ६ लाख ९ हजार २९८ किंमतीची ३२८ लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याविरूद्ध रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने अशा दलालांची तक्रार करण्याकरिता प्रवाशांसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे आता रेल्वे स्थानकांवर तिकीट दलाल दिसून येत नाही आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -