घरटेक-वेकTikTok सारखं Insta चं Reels तर व्हिडिओ कॉलिंगसाठी Zoom नंतर Facebook चं...

TikTok सारखं Insta चं Reels तर व्हिडिओ कॉलिंगसाठी Zoom नंतर Facebook चं ‘हे’ नवं फीचर लाँच!

Subscribe

जिओने देखील व्हिडिओ कॉन्फरन्स jio meet नावाचे App सुरू केले, त्यानंतर आता फेसबुकही त्या स्पर्धेत उतरून फेसबुकने Facebook Room हे फीचर लाँच केले आहे. जाणून घ्या, त्या फीचर विषयी...

केंद्र सरकारने TikTok सह इतर अनेक चीनी Apps वर बंदी घातल्यानंतर आता जगभरातील देशांमध्ये चीनविरूद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. यानंतर भारताने अनेक Made In India चे Social Media App तयार करताना दिसत आहे. यानंतर Facebook आणि Instagram सारख्या सोशलसाईट्स सुद्धा आपल्या युजर्ससाठी भन्नाट फिचर्स घेऊन दाखल झाले आहे. सध्या Facebook च्या Facebook Avatar या नव्या फिचरनंतर प्रत्येकाच्या वॉलवर नवं फिचर दिसू लागलंय ते म्हणजे फेसबुक Room… TikTok सारखं Instagram चं Reels फीचर आल्यानंतर Facebook ने Room हे नवं फीचर लाँच केलं आहे.

लॉकडाऊनदरम्यान अनेक कंपन्यांचे कर्मचारी work from home करत असल्याने त्याच्या मीटिंग्स या देखील ऑनलाईन पद्धतीनेच होत आहेत. तर लॉकडाऊन काळात वेगळ्या क्षेत्रातील उद्योग जगतात, ऑनलाईन शाळा, कॉलेज, क्लासेस, कॉन्फरन्ससाठी व्हिडिओ मीटिंग केल्या जात आहे. यासाठी गुगल मीट, झूमसारखी अॅप्स सर्वाधिक वापरले जात आहेत. याच स्पर्धेत राहण्यासाठी जिओने देखील व्हिडिओ कॉन्फरन्स jio meet नावाचे App सुरू केले, त्यानंतर आता फेसबुकही त्या स्पर्धेत उतरून फेसबुकने Facebook Room हे फीचर लाँच केले आहे. जाणून घ्या, त्या फीचर विषयी…

- Advertisement -

हे Rooms फीचर वापरुन युजर रुम्स क्रिएट करु शकतो. आपल्या फ्रेंड लिस्टमधील मंडळींसोबत मेसेंजर रुममध्ये तब्बल ५० व्यक्तींना घेऊन अनलिमिटेड व्हिडिओ कॉलिंग युजर्सना करता येणार आहे.

हे फीचर zoom अॅपला मुख्यत्वे टक्कर देताना दिसून येत आहे तर दुसरीकडे टिक टॉक बंद झाल्यावर चिंगारीसारख्या अॅपकडे टिकटॉकर्स वळले होते. पण आता टिकटॉक सारखे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर देखील करता येणार आहेत . हे नवं फीचर इन्स्टाग्रामच्या स्टोरीमध्ये दाखल झालेलं युजर्सना बघायला मिळणार आहे.


Tik Tok ला टक्‍कर देण्यासाठी Instagram कडून स्पेशल App लाँन्च!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -