घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी औरंगाबादमध्ये होमहवन आणि पूजा, चंद्रकांत खैरेंनी केले आयोजन

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी औरंगाबादमध्ये होमहवन आणि पूजा, चंद्रकांत खैरेंनी केले आयोजन

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. यासाठी शिवसेनेकडून तयारी झाली आहे. ही सभा निर्विघ्न पार पडावी यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी होमहवन करत पूजा केली. ही पूज दौलताबाद येथील दक्षिनमुखी मारूत मंदिरात गेल्या 7 दिवसांपासून सुरू आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेत कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत म्हणून 1 तारखेलपासून 11 ब्राम्हणांच्या उपस्थितीत हनुमंताची आराधना करण्यात आली. दौलताबादच्या दक्षिणमुखी मारूती मंदिरात ही पूज सुरू आहे. यावेळी पूजा करणाऱ्या ब्राम्हणांनी केलेल्या दाव्यानुसार, अशी पूजा केल्याने आलेले सर्व संकटे दूर होतात. सर्व कार्य मनाप्रमाणे होतात.त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभेत सुद्धा कोणतेही अडचण निर्माण होऊ नयेत आणि सभा चांगली पार पडावी म्हणून पूजा केली जात असल्याच शिवसैनिक म्हणाले.

- Advertisement -

शिवसेनेचा टीझर जारी –
उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेकडून आतापर्यंत अनेक टीझर जारी करण्यात आला आहे. सभेच्या एक दिवस आधी एक टीझर शिवसेनेने जारी केला आहे. या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबादच्या नामांतराच्या मागणीचे केलेले भाषण दावण्यात आले आहे. सोबतच, लाखोचा भगवा गजर, आपलं संभाजीनगर…सिंहगर्जना घुमणार खरे हिंदुत्व काय? हे संभाजीनगर सांगणार,भगवी पताका फडकणार हिंदुत्वाचाझेंडा उंच राहणार,प्रखर हिंदुत्वासाठी भगव्या एल्गारासाठी हिंदुत्वाचा नारा दुमदुमणार सर्वत्र भगवे वादळ घुमणार,शिवबंधन दृढ राहणार हिंदुत्व चेतवणार,हिंदुत्वाचा गजर चलो संभाजीनगर…असे टीझरमध्ये म्हटले आहे.

मनसेची टीका –
मनसे नेते गजानन काळे यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी संभाजीनगर असे म्हणत बँनरबाजी करायची..मी संभाजीनगर म्हणतोय ना असे सभेत म्हणायच, एवढं करून झालं का? औरंगाबादचे संभाजीनगर कधी होणार मुख्यमंत्री महोद्य?,संभाजीनगरला असलेलं औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत करायची घोषणा सभेत होणार का?, भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरून आल्यावर अवघढ वाटतंय सगळं अशी टीका काळे यांनी केली आहे. त्यामुळे शिवसेना- मनसेमध्ये पुन्हा एकदा एकमेकांवर टीका केली जाण्याची शक्यता आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -