घरमहाराष्ट्र९३ च्या बॉम्बस्फोटतील आरोपींकडून जमीन घेतल्याप्रकरणी मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा -...

९३ च्या बॉम्बस्फोटतील आरोपींकडून जमीन घेतल्याप्रकरणी मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – चंद्रकांत पाटील

Subscribe

अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते टाडा लागणारी जमनी स्वस्तात विकत घेतली हे त्यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे त्यांची एनआयएद्वारे चौकशी झाली पाहिजे. त्यांना एनआयएने तातडीने चौकशीला बोलवावं आणि मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये यांचे अनेकांचे संबंध आहेत. वोहरा कमीशन (Vohra Commission) ज्यामध्ये सगळ्या राजकीय नेत्यांची नावे घेतली आहेत. वोहरा कमीशन आता सगळ्यांसाठी खुला केला पाहिजे. अशी मागणी मी केंद्र सरकारकडे करणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. वोहरा कमीशनमध्ये ९३ बॉम्बस्फोटमध्ये कोण होते, महाराष्ट्रातील टॉपचे नेते जे आहेत त्यांचे चेहरे आता उघडे पाडा. टॉपचा नेत्याचा जर अंडर्वर्ल्डशी संबंध आहे, दाऊदशी संबंध आहे, तर मलिकांनी तरी काय करावं? त्यांनी जमीनी घेतल्या, व्यवसाय केला. एनआयएने त्यांची चौकशी करावी, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. नवाब मलिक यांना राज्यातील कोणत्याही गावात फिरू देणार नाही, असा धमकीवजा इशारा देखील चंद्रकांत पाटील यांनी मलिकांना दिला.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांना सरकारी रुग्णालय का चालत नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकारी रुग्णालय का चालत नाही? असा सवाल करत याचाच अर्थ राज्यातील सरकारी रुग्णालय सुस्थितीत नाहीत हे सिद्ध होतंय, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मला वैयक्तिक टीका करायची नाही. पण फडणवीस यांना कोरोना झाल्यानंतर ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -