घरक्रीडाNational wrestling championship : आई झाल्यानंतर गीता फोगटचे कमबॅक; महिला पैलवानांसोबत ट्रेनिंग...

National wrestling championship : आई झाल्यानंतर गीता फोगटचे कमबॅक; महिला पैलवानांसोबत ट्रेनिंग टाळले, म्हणाली…

Subscribe

भारताची स्टार पैलवान गीता फोगट ३ वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा नव्या दंगलसाठी तयार झाली आहे

भारताची स्टार पैलवान गीता फोगट ३ वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा नव्या दंगलसाठी तयार झाली आहे. मात्र आई झाल्यानंतरच्या तिच्या आयुष्यातील दुसऱ्या अध्यायाबाबत ती थोडीशी नाराज आहे. पुढच्या महिन्यात गीता ३३ वर्षांची होणार आहे अशातच गीता फोगटला कित्येक जणांनी सांगितले की आई झाल्यानंतर गीताला पहिल्यासारखी कुस्ती खेळता येणार नाही. कारण मागील ३ वर्षात खेळच नाही तर गीताचे शरीर देखील बदलले आहे. मात्र तिने आता सध्या कुस्ती खेळण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत पुनरागमन केल्यानंतर गीताने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, खूप काहीजण आहेत जे मला सांगतात की तुझे वय तुझ्यासाठी आताच्या घडीला तुझ्या बाजूने नाही.

गीता फोगटने आणखी म्हटले की, “कित्येक जण मला माझ्या वयाबद्दल प्रश्न विचारत आहेत. मात्र मारिया स्टेडनिकला बघितले तर लक्षात येईल तिचे वय ३३ पेक्षा अधिक आहे आणि ती २ मुलांची आई आहे. तिच्या नावावर ४ ऑलिम्पिक पदक आणि विश्व चॅम्पियनशिपमध्ये कित्येक पदक आहेत. जर आपल्याकडे चांगला फिटनेस आहे आणि आपण खेळावर एकाग्र असलो की सगळे काही करू शकतो”.

- Advertisement -

संन्यासाचा विचार देखील भीती दाखवतो

गीताने सांगितले मी माझ्या फिटनेससाठी खूप मेहनत केली आहे आणि स्वत:ला पुन्हा एकदा सिध्द करण्याची ही वेळ आहे. तिने सांगितले कुस्तीला सोडून द्यायचा विचार देखील मला भीती दाखवतो. कुस्ती माझ्या रक्तात आहे. मी २० वर्षांपासून हे करत आली आहे. माझ्या मनात पॅरिस ऑलिम्पिक आहे. तर गीताने मागील काही दिवसांत फक्त पुरूष पैलवानांसोबत ट्रेनिंग केली आहे.

गीताने पुरूष पैलवानांसोबतच्या ट्रेनिंगबाबत भाष्य केले. तिने सांगितले मी ज्या आखाड्यात सराव करत होती तिथे चांगली अशी कुणीही महिला पैलवान नव्हती. त्यामुळे मी पुरूष पैलवानांसोबत सराव केला यामुळे मजबूती आणि क्षमता याचा काही विषय नाही. मला वाटते की ३ वर्षांपूर्वी जेव्हा मी कुस्तीतून विश्रांती घेतली होती त्याच्या तुलनेत आता अधिक फिट आहे. मी महिला पैलवानांसोबत सराव केला नाही म्हणून मला नाही माहित मी प्रतिस्पर्धी पैलवानाचा सामना करण्यात मजबूत आहे की कमजोर. आताच्या घडीला मला माझ्या खेळीचे विश्लेषण करता येणार नाही. महिला पैलवानांसोबत सराव केल्यावर लक्षात येईल. असे गीताने आणखी बोलताना सांगितले.

- Advertisement -

हे ही वाचा: Corona pandemic : जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेला पुढच्या वर्षापर्यंत स्थगिती


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -