घरमहाराष्ट्रमहापौरांच्या बालिश विधानावर बोलायचं नाही - चंद्रकांत पाटील

महापौरांच्या बालिश विधानावर बोलायचं नाही – चंद्रकांत पाटील

Subscribe

मला मुंबईच्या महौपौरांचा परिचय नाही. तसंच, मला महापौरांच्या बालिश विधानावर मला बोलयचं नाही आहे, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थतीवरुन चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टिकेला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रोखठोक उत्तर दिलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी चंद्रकांत पाटील यांनी विधानभवनात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली. “मला मुंबईच्या महापौरांचा परिचय नाही. मला त्यांच्यावर बोलायची इच्छा नाही
इतकं बालीश वक्तव्य आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसंच, पुढे अमृता फडणवीस यांच्याकडे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सोपवण्यावर बोलताना त्यांनी “मी म्हणतोय काय उद्धव ठाकरे यांनी आजारी असताना विधानसभेत येण्याचा हट्ट धरु नये. त्यांनी जबाबदारी सोपवावी. देवेंद्र फडणवीस आजारी आहेत का? ते झोपलेले आहेत का? ते काम करु शकत नाहीत का? काय बोलता?” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

मंत्री व्हा म्हणून घरी निमंत्रण द्यायला आलं नाही

मुख्यमंत्री असताना अनेक प्रसंग असे घडतात. त्या प्रसंगावरुन उत्तर द्यावी लागतात. देवेंद्र फडणवीस सावध असायचे. ते जेव्हा विदेशात जायचे तेव्हा कोणाकडे तरी जबाबदारी द्यायचे. एलफिन्स्टनचा ब्रिज पडला तेव्हा ते विदेशात होते, जेव्हा ते पहाटे आले तेव्हा ते थेट घटनास्थळी गेले. तुम्हाला कोणी निमंत्रण द्यायला घरी येत नाही की, आमदार व्हा, मंत्री व्हा, खासदार व्हा. तुम्ही तुमच्या हिंमतीवर जबाबदारी घेतली असेल तर ती जबाबदारी निभावली पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.


हेही वाचा – तुम्ही अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?, महापौर किशोरी पेडणेकर चंद्रकांत पाटलांवर संतापल्या

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -