घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Winter Session 2021 : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी

Maharashtra Assembly Winter Session 2021 : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी

Subscribe

हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आजदेखील विरोधी पक्षातील नेत्यांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं जात आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधक बसले असून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे नेते उपस्थित आहेत. तसेच त्यांच्याकडून ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.

विजेची देयके भरणे, ओबीसी आरक्षण, बनावट कंपन्या, आरोग्य विभाग आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरण आणि इतर मागण्यांसाठी विरोधी पक्षातील नेत्यांकडून आंदोलनं केली जात आहेत.

- Advertisement -

दरम्यान, राज्यात हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरूवात झाली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुद्धा विरोधी पक्षातील नेत्यांकडून ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. शेतकऱ्यांची वीज कापणे बंद करा, आरोग्य विभाग आणि म्हाडा भरती परीक्षेत झालेल्या पेपरफुटीची सीबीआय मार्फत चौकशी करा आणि शेतकऱ्यांना इन्टेन्सिव्ह द्या. अशा प्रकारच्या घोषणा विरोधकांकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हेच मुद्दे आता विरोधी पक्षाकडून सभागृहात मांडले जाण्याची शक्यता आहे. मात्र, काल सभागृहात झालेल्या गोंधळावरून आजचंही अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा : राम मंदिरासाठी झटलं कोण… मंदिराच्या नावावर पैसे खातंय कोण – खासदार संजय राऊत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -