घरताज्या घडामोडीशिवसेना "युपीए"मध्ये गेल्यास आश्चर्य वाटणार नाही, चंद्रकांत पाटील यांचे विधान

शिवसेना “युपीए”मध्ये गेल्यास आश्चर्य वाटणार नाही, चंद्रकांत पाटील यांचे विधान

Subscribe

लोकांना संबोधित न करण्यामुळे सगळा समाज हा संभ्रमित आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांची सदीच्छा भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेना आता ज्या प्रकारे काँग्रेसशी जवळीक करत आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना युपीएमध्ये आल्यास आश्चर्य वाटणार नाही असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तसेच बागुलबुवा न करत काळजी घ्यायची असेल तर सांगा पण घरी बसा असं सांगितल्यास कोणी थांबणार नाही असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेची काँग्रेससोबतीच जवळीक पाहता युपीएत जातील का? असा प्रश्न केला, यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, ज्या प्रकारे शिवसेनेचा प्रवास चालला आहे. त्याने ते युपीएमध्ये आल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

- Advertisement -

समाज संभ्रमित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला संबोधित करणार आहेत. यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, लोकांना संबोधित न करण्यामुळे सगळा समाज हा संभ्रमित आहे. त्यामुळे ते उशीरा करत आहेत की, लवकर करत आहेत. मातोश्रीतून करत आहेत की मंत्रालयातून का वर्षावरुन करत आहेत. याच्यापेक्षा ते संबोधित करत आहेत ते महत्त्वाचे आहे. अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

बागुल बुवा उभा करु नका

राज्यातील समाजाचा प्रेशर इतका की, सर्वसामान्य माणूस केव्हा ज्याने कधी उंदीरही मारला नाही तो आता आक्रमक होणार आहे. व्यापाऱ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढेल, पुण्यात सकाळी ७ ते ४ दुकाने सुरु आहेत मात्र व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, तास कमी न करता १० ते ७ एवढा वेळ करा तर अस चालणार नाही असे प्रशासनाने म्हटलं आहे. व्यापाऱ्यांनी मला धमकी देऊ नये असे चालणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. जो वर्ग दिवसाचा परिश्रम केल्यावर घरात पेटतो असा वर्ग आता ऐकणार नाही. यामुळे बागुलबुवा उभा न करता काळजी घ्यायची असेल तर सांगा, डबल मास्क लावायला लागणार आहे. मास्क बदलायला लागणार आहे. मात्र घरी बसा असं सांगितल्यास कोणी बसणार नाही असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -