घरलाईफस्टाईलदीप अमावस्येला लहान मुलांना का ओवाळले जाते?,जाणून घ्या दीप अमावस्येचे महत्व

दीप अमावस्येला लहान मुलांना का ओवाळले जाते?,जाणून घ्या दीप अमावस्येचे महत्व

Subscribe

श्रावण महिन्याची सुरुवात होताच चाहूल लागते ती वेगवेगळ्या सण उत्सवाची. पण श्रावणचा पवित्र महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशीच एक महत्वपूर्ण दिवस असतो तो म्हणजे दीप अमावस्या. आषाढ महिन्याच्या शेवट्या दिवशी येणाऱ्या दीप अमावस्याचे विशेष महत्व भारतीय संस्कृतीत आहे. या दिवशी घरातील दिव्यांची पूजा करण्यात येते कारण श्रावण महिण्यात दिप प्रज्वलनाचे अत्याधीक महत्व असते. यामुळेच आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमवस्या साजरी करण्यात येते. आज आपण या दिवसाचे महत्व काय आहे तसेच दिव्यांची पूजा कशी करवी, आणि तिथीनुसार अवस्येचा कालावधी कोणता आहे हे जाणून घेणार आहोत.

दीप अवस्याचे महत्व-

- Advertisement -

गरूड पुराणानुसार जो व्यक्ती आषाठ अमावस्याचे व्रत करतो तसेच पूजाविधी,दान करतात त्यांना सर्व प्रकाराच्या दोषापासून तसेच पापातून मुक्ती मीळते. तसेच या दिवशी गंगास्नान करणे ,दान देणे फार लाभदायक आहे. या दिवशी माशांना पीठाचे गोळे करुन खायला दिले जातात. भारतात काही ठिकाणी आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालतात.तर अनेक लोकं या पवित्र दिवशी पितरांना तर्पण देत पुरणाचा नैवैद्य दाखवतात असे केल्यास पितर प्रसंन्न होतात असे मानले जाते. इकतचं नाही तर या दिवशी व्रत केल्याने पुर्वजांच्या आत्म्यास शांती लाभते. या दिवशी एखादे झाड लावल्यास ग्रह दोष देखील शांत होतो.

तिथीनुसार कधी असते दीप अमवस्या

- Advertisement -

पंचांगानुसार यंदा दीप अमावस्या शनीवार , 7 ऑगस्टपासून संध्याकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी सरु होणार आहे तसेच आदल्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच 8 ऑगस्ट संध्याकाळी 7 वाजून 20 मिनिटार्यंत असणार आहे.

अशी करा पूजा-

महिलांनी या दिवशी सकाळीच घरातील दिवे,निरांजन,समई,लामण स्वच्छ करुण ठेवावे. तेच पाटावर मांडून त्यांची पूजा करावी . नेहमीप्रमाणे पाटाभोवती रांगोळी काढून सुवासिक फुलांनी त्याची सजावट करावी सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून दिप प्रज्वलित करावे. अशा प्रकारे आषाढी दीप अमवस्या साजरी करण्यात येते. तसेच काही ठिकाणी ओल्या मातीच्या दिव्यांची पूजा करण्यात येते. हळद,कूंकू,अक्षता,फूले वाहून दिव्यांची पूजा केली जाते.तर अनेकजण कणकेचे उकडलेले गोड दिवे तयार करुन नैवैद्य दाखवतात व सांयकाळी सर्व दिव्यांची आरती करण्यता येते. शुभंकरोती ही प्रर्थना करुन लहान मुलांना सांयकाळी ओवाळलं जात. लहान मुले ही घरातील वंशाचा दिवा आहे असे मानले जाते म्हणून या दिवशी त्यांना ओवाळण्यात येते.


हे हि वाचा – शुगर लेवल वाढू लागल्यास मधुमेह रुग्णांमध्ये दिसू लागतात ही 5 लक्षणे,वेळीच सावध व्हा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -