घरताज्या घडामोडी२०२४ मध्ये करेक्ट कार्यक्रम करण्याचं चॅलेंज स्वीकारतो, बावनकुळेंचं अजित पवारांना आव्हान

२०२४ मध्ये करेक्ट कार्यक्रम करण्याचं चॅलेंज स्वीकारतो, बावनकुळेंचं अजित पवारांना आव्हान

Subscribe

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारातमी दौऱ्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. २०२४ मध्ये करेक्ट कार्यक्रम करण्याचं चॅलेंज स्वीकारतो, असं आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांना दिलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, माझ्या बारामतीच्या एका दौऱ्यामुळे अजित पवार यांच्यावर एवढा फरक पडला की ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले आहे. बारामती शहराचा विकास म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विकास नाही. अजित पवार यांच्याबद्दल तिथे प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे २०२४ मध्ये त्यांचा करेक्ट कार्यक्रम जनताच करेल. परंतु त्यांचे कुठलेही चॅलेंज स्वीकारायला मी तयार आहे, असं बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

अजित पवारांनी आपल्या पक्षावर लक्ष ठेवायला हवं. सत्तेची फळं चाखल्यानंतरही त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला नाही. सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता, असेच त्यांचे राजकारण राहिले आहे. ते ओबीसींचे मारेकरी आहेत, असाही आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

बारामतीत एन्ट्री झाल्यापासून अजित पवारांना माझी भिती वाटतेय. आमचा करेक्ट कार्यक्रम करू, असं त्यांनी काल सभागृहात म्हटलं आहे. पण आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची अजित पवारांमध्ये हिंमत नाहीये. त्यांचा केव्हा करेक्ट कार्यक्रम होईल, हे २०२४ मध्ये जनता ठरवणार आहे. त्यामुळे अजित पवारांच्या तोंडून हे शब्द शोभत नाहीत, असंही बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

काय म्हणाले होते अजित पवार?

सप्टेंबर महिन्यात आपलं सरकार आल्यानंतर एक नेते बारामतीत आले. त्यानंतर त्यांनी वल्गना करत बारामतीत घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम त्यांनी केला. आमचं तिथं काम असल्यामुळे खरचं तिथे करेक्ट कार्यक्रम होणार आहे का?, जर मी मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेन. महाराष्ट्राला माहितीये मी एखाद्याला चॅलेंज दिलं ना तर मी कुणाचंही ऐकत नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतात तसं, मी कुणाच्याही बापाचं ऐकत नाही, असं अजित पवार म्हणाले होते.


हेही वाचा : बारामतीत घड्याळ बंद करण्याचा प्रयत्न, मनात आणलं तर…, अजित पवारांचा बावनकुळेंना टोला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -