घरमहाराष्ट्रयुवक देशाचे भविष्य आहे, त्याला आम्ही नशेच्या गर्तेत बुडू देणार नाही -...

युवक देशाचे भविष्य आहे, त्याला आम्ही नशेच्या गर्तेत बुडू देणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे

Subscribe

महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचाराबरोबरच ड्रग्ज विक्रेत्यांना संरक्षण देण्यात व्यस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे एक ज्येष्ठ मंत्री अमली पदार्थ विक्रेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला तुरुंगात पाठवण्याची धमकी देत आहेत. त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले करत आहेत, हे निषेधार्ह आहे. याकडे मुंबईसह संपूर्ण देशातील जनता पाहत आहे. याचे सडेतोड उत्तर मुंबईसह महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला देईल, असे प्रतिपादन भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. तसंच, युवक देशाचे भविष्य आहे, त्याला आम्ही नशेच्या गर्तेत बुडू देणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील गृहराज्यमंत्री यांना भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे आपले पद गमवावे लागले हे आपण सर्वांनी पाहिले आहे. मुंबई पोलीस विभागामार्फत त्यांच्याकडून मासिक १०० कोटी जमा होत होते आणि त्याचा तपास अजूनही सुरू आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडी सरकारचे आणखी एक मंत्री ड्रग्ज विक्रेत्यांची लॉबिंग करून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला तुरुंगात पाठवण्याची धमकी देत असल्याने सरकारचे मनसुबे उघड होत आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारात गुंतले आहे. ड्रग्जच्या माध्यमातून आपले आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी तरुण-तरुणी उत्सुक आहेत. त्यांचा हा हेतू भाजप कदापी यशस्वी होऊ देणार नाही. गावा-गावात, घरोघरी जाऊन आम्ही भाजप युवा योद्धा तयार करू, जो अंमली पदार्थांच्या विक्रेत्यांविरोधात उभा राहून राष्ट्र उभारणीसाठी काम करेल.

मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मुंबईतील पाच लाख युवकांना जोडले जाईल. हे लक्ष्य आम्ही २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करू. यासोबतच तरुणांना अंमली पदार्थांच्या विरोधात जागृत करण्याचे कामही आम्ही करणार आहोत. भाजप केवळ विकासाचे काम करत नाही, तर तरुणांचे भविष्य घडविण्याचे कामही करते. युवकांच्या हितासाठी आम्ही वेळोवेळी अनेक कार्यक्रम करतो, जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -