घरमहाराष्ट्र....तर तुमच्या पत्रकार परिषदा होऊ देणार नाही; मर्द, षंढ शब्दांवरून बावनकुळेंचा राऊतांना...

….तर तुमच्या पत्रकार परिषदा होऊ देणार नाही; मर्द, षंढ शब्दांवरून बावनकुळेंचा राऊतांना इशारा

Subscribe

मुंबई – महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर आक्रमक होत टीका केली आहे. सरकार षंढ आणि नामर्द आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागलं. मात्र, संजय राऊतांच्या या अशोभनीय शब्दांविरोधात भाजपा आता आक्रमक झाली आहे. राऊतांचा हा आक्रमकपणा थांबला नाही तर तुमच्या पत्रकार परिषदा होऊ देणार नाहीत, असा इशाराच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिला. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित जाहीर करा, अन्यथा…, संजय राऊतांचा इशारा

- Advertisement -

संजय राऊत तुरुंगात जाऊन आल्याने तेथून ते कैद्यांकडून अशी भाषा शिकून आले आहेत. पण अडीच वर्षे षंढ कोण होतं? हनुमान चालिका पठणासाठी महिला खासदार नवनीत राणा मातोश्रीवर येणार होत्या. पण त्यांच्यावर कारवाई झाली. त्यांना कशी वागणूक दिली गेली? मग तुम्ही षंढ नाही का? असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना चॅलेंज का करताय? ते संयमाने काम करतात. सरकारमध्ये असल्यामुळे संयम पाळावा लागतो. चॅलेंज दऊ नका. महाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक वातावरण खराब करू नका, असं आवाहनही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

महाराष्ट्राचं वातावरण गढूळ झालं आहे, याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. तुमच्यात विकासाची धमक पाहिजे. पण तुमच्याने पेन चालत नाहीत. एकातरी आमदाराच्या पत्रावर सही केली का? असा सवाल उपस्थित करत जी २० परिषदेत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी सहभागी व्हायला पाहिजे होतं, असंही बावनकुळे म्हणाले. दोघांना फोन केले. पवारांची तब्येत ठिक नव्हती त्यामुळे ते आले नाहीत हे समजू शकतो. पण अजित पवारही गेले नाहीत. त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला. जगातील सारे देश महाराष्ट्रात येणार आहेत. मुंबई-पुण्यात जगभरातील कंपन्या येणार आहेत. पण जी २० परिषदेच्या बैठकीला हे नेते गेलेच नाहीत. अडीच वर्षे सत्तेत होतात, मग परिषदेला जाणं महत्त्वाचं होतं. ममता बॅनर्जी आल्या होत्या, पण तुम्ही आला नाहीत. प्रकाश आंबेडकरांना भेटणं जास्त महत्त्वाचं होतं की परिषद? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – उठ मराठ्या उठ! महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

संजय राऊतांनी अशी बेताल वक्तव्ये आणि अशोभनीय भाषा सोडली नाही तर पत्रकार परिषदा घेऊ देणार नाहीत, असा सज्जड दमच चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिला.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -