घरमहाराष्ट्रगॅस गळतीमुळे स्फोट; एकाच कुटुंबातील ५ जण जखमी

गॅस गळतीमुळे स्फोट; एकाच कुटुंबातील ५ जण जखमी

Subscribe

गॅस गळतीमुळे पिंपरी- चिंचवडमधील एका घरामध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर घराला आग लागली. या आगीमध्ये बिरादार कुटुंबातील ५ जण जखमी झाले आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या कासारवाडीमध्ये गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात एका घराला भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घटना घडली आहे. जखमींवर पिंपरी-चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गॅस गळतीमुळे स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, कासारवाडी परिसरातील केशवनगरमधील गुरुनाथ कॉलनीत ही दुर्घटना घडली आहे. सध्या कडाक्याची थंडी आहे त्यामुळे बिरादार कुटुंबाने दार आणि खिडक्या बंद केल्या होत्या जेणेकरून थंड वारे घरात येऊ नये. परंतु आज सकाळी सर्वजण गाढ झोपेत असताना गॅस गळतीमुळे भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत घरातील पाच जण जखमी झाले असून तीन लहान मुलांचा समावेश आहे. घरातील मुख्य व्यक्ती बाहेरगावी असल्याने ते बचावले आहेत. दरम्यान,जखमींना पिंपरी-चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

तीन लहान मुलं जखमी

जखमांमध्ये बिरादार कुटुंबातील तीन लहान मुलांसह ५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर पिंपरी-चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी घरातील सर्वजण झोपे असताना ही घटना घडली. त्यामुळे कोणालाही घराबाहेर पडता आले नाही. या दुर्घनेमध्ये ३० वर्षाच्या शोभा बिरादार, ८ वर्षाचा गणेश बिरादार, ५ वर्षाचा शुभम बिरादार, ३ वर्षाचा देवांश बिरादार, आणि २२ वर्षाचा विजय जाधव जखमी झाला आहे.

हेही वाचा – 

आगीचे सत्र सुरुच; पनवेलच्या वैदू नगर झोपडपट्टीला भीषण आग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -