घरताज्या घडामोडीवेळ पडल्यास वाघ पंजाही मारु शकतो, भुजबळ यांचा भाजपला इशारा

वेळ पडल्यास वाघ पंजाही मारु शकतो, भुजबळ यांचा भाजपला इशारा

Subscribe

बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी स्वतःचं नाव विमानतळाला देणे नाकारले असते

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात सुरु असलेल्या वाकयुद्धात आता राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न वितरण मंत्री छगन भुजबळ यांनी उडी घेतली आहे. मैत्री कोणाशी करायचे हे वाघाच्या मनावर अवलंबून असते तसेच वेळ पडल्यास वाघ पंजाही मारु शकतो असा इशारा छगन भुजबळ यांनी भाजपला दिला आहे. तसेच आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी नवी मुंबई विमानतळाला स्वतःचे नाव नाकारले असते असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे. मागील काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत यांच्या शाब्दिक वाकयुद्ध सुरु आहे. यामध्ये आता छगन भुजबळ यांनी इशारा दिलाय.

राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजपला इशारा दिला आहे. छगन भुजबळ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वैयक्तिक भेटीवर प्रश्न करण्यात आला होता. तसेच शिवसेना मवाळ भूमिका घेत असल्याचे विचरले असता भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे अनेक प्रश्न केंद्राशी संबंधित आहेत. यामुळे जमवून घ्यावे लागते. परंतु मैत्री करायची की नाही हे वाघाच्या मनावर आहे. वेळ पडल्यास वाघ पंजा मारू शकतो असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.

- Advertisement -

बाळासाहेब असते तर….

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरुन बराच वाद सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी स्वतःचं नाव विमानतळाला देणे नाकारले असते जे.आर.डी.टाटा यांचं विमानतळाला द्यायला बाळासाहेबांनी सुचवले असते असे भुजबळ यांनी म्हटले आहे. दी. बा. पाटील यांच्याही नावाला आमचा पाठिंबा आहेच परंतु नामकरणाचा मुद्दा एखदा बसून सोडवला पाहिजे असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.

संभाजीराजे छत्रपती सुज्ञ

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. आमचा मराठा आंदोलनाला विरोध नाही परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कसं आंदोलन करायचं याबाबत आम्ही काय सागणार राजे सुज्ञ आहेत. ते नक्कीच खबरदारी घेतील. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देऊ यामुळे मराठा आरक्षण मोर्चामुळे ओबीसींनी विचलित होण्याचं कारण नाही असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तसेच हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुटणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -