घरमहाराष्ट्रसरकारकडे आपत्कालीन सुविधा पुरवण्याची काय नियमावली आहे?, संभाजीराजेंचा मेटेंच्या अपघाती निधनानंतर सवाल

सरकारकडे आपत्कालीन सुविधा पुरवण्याची काय नियमावली आहे?, संभाजीराजेंचा मेटेंच्या अपघाती निधनानंतर सवाल

Subscribe

मुंबई – मराठा अरक्षण मिळावे यासाठी पाठपुरावा करणारे आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. या अपघातानंतर एक तास उशिरा आपत्कालीन मदत पोहोचली. या कारणामुळे राज्य आणि केंद्र सरकारवर टीका होत आहे. स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी यावर टीका करत यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे जबाबादार धरले आहे.

संभाजीराजे काय म्हणाले –

- Advertisement -

विनायक मेटे यांनी मी श्रद्धांजली वाहतो. सरकारने जी चौकशी करायची आहे ती करावी. विनायक मेटे यांच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे. अपघात झाल्यानंतर मेटे यांना एक तास उशिरा आपत्कालीन मदत मिळाली. सरकारकडे आपत्कालीन सुविधा पुरवण्याची काय नियमावली आहे, असा प्रश्न संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र आणि राज्य सरकारला विचारला आहे.

दरम्यान मुंबई-पुणे मार्गावर रहदारी असते. येथे आपत्कालीन मदत पोहोचविणाऱ्या दोन ते तीन गाड्या असायला हव्यात. अशी अचानक घटना घडली तर मदत पोहोचावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने योग्य ती तरतूद करायला हवी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

- Advertisement -

हा आमच्यासाठी मोठा धक्का –

विनायक मेटे मराठवाड्याचे मराठा समाजाची शान होते. ते आज आमच्यातून निघून गेले. हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. ही पोकळी कशी भरून निघेल याचे उत्तर आमच्याकडे नाही. बीडसारख्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीतून ते आले होते. गरीब मराठा समाजाला झळ बस नये यासाठी त्यांचा लढा सुरू होता. विनायक मेटे यांनी मराठा समाजाची बाजू प्रभावीपणे मांडली. मोठे बंधू म्हणून ते मला नेहमी सल्ला द्यायचेय. सरकारवर दबाव टाकायचा असेल तर आपण एकत्र येणे गरजेचे आहे, असे ते नेहमी सांगायचे, अशा भवना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केल्या .

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -