घरमहाराष्ट्रबंजारा समाजाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उशिरा पोहोचले, जमावाकडून गोंधळ

बंजारा समाजाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उशिरा पोहोचले, जमावाकडून गोंधळ

Subscribe

वाशिम – संत श्री सेवालाल महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह १५ मंत्री आज पोहरादेवी येथे गेले आहेत. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समक्ष कार्यक्रमात उपस्थित बांधवांनी गोंधळ घातला. कार्यक्रम उशीरा सुरू झाल्याने नाराज झालेल्या उपस्थितीतांनी घरचा रस्ता धरला असताना हा गोंधळ निर्माण झाला. परिणामी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून खुद्द संजय राठोड यांच्या पत्नी शीतल राठोड यांनी भर गर्दीत जाऊन जमावाला शांत केले. शीतल राठोड यांनी बंजारा समाजाचे पारंपरिक पोषाख परिधान केला होता.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून संत श्री सेवालाल महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच १३५ फूट उंच सेवाध्वजाची स्थापना करण्यात आली. तसेच या भागातील ५९३ कोटींच्या कामांचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला बंजारा समाजातील लोकांनी मोठ्याप्रमाणावर हजेरी लावली होती. मात्र, नियोजित वेळेपेक्षा हा कार्यक्रम उशिराने सुरू झाला. त्यामुळे कार्यक्रमस्थळी पोहोचलेल्या लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.

- Advertisement -

कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे बंजारा बांधव सभामंडपातून उठून निघून जाऊ लागले. त्यामुळे उठून जाणाऱ्या जमावाला पोलिसांनी अडवलं त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. यामुळे पोलिसांसोबत शितल राठोड यांनी गर्दीत शिरून लोकांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. सभामंडपात जागोजागी फिरून त्यांनी बांधवांना शांत राहण्याचे आवाहन केलं. तसंच, राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी अपुऱ्या आयोजनाबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -