घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, मोठी कारवाई करायचीय...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, मोठी कारवाई करायचीय…

Subscribe

औरंगाबाद : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. आज सकाळी सातच्या सुमारासच सीआरपीएफच्या फौजफाट्यासह ईडी अधिकाऱ्यांचे एक पथक संजय राऊत यांच्या भांडुपस्थित मैत्री या निवासस्थानी पोहोचले. यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. औरंगाबाद येथे मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील प्रसार माध्यमांनी याबाबत प्रश्न विचारला होता.

मनी लॉण्ड्रींग कायदा २०२२ अंतर्गत गोरेगावमधील पत्रावाला चाळ पुर्निविकास प्रकल्पामधील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने यापूर्वी दोन वेळा संजय राऊत यांना समन्स बजावले होते. पण दोन्ही वेळेस ते हजर न झाल्याने ईडीचे अधिकाऱ्यांनी थेट संजय राऊत यांचे निवासस्थान गाठले. त्यानंतर संजय राऊत यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे नेते आणि शिवसैनिकांनी मैत्री निवासस्थानाजवळ गर्दी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सर्वसामान्य शिवसैनिक आज आनंदी, ईडी छाप्यावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो की, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय आणि मी शिवसेनेसाठी लढत राहीन, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. तर, ईडीचे अस्त्र कसे वापरायचे हे भाजपला चांगले माहीत आहे. पण आम्ही संजय राऊत यांच्या पाठीशी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, तपास यंत्रणांना देशातील कोणत्याही व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकार आहे, अशी सावध प्रतिक्रिया नोंदवली आहे. दुसरीकडे, शिंदे गटातील आमदारांनी या कारवाईबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

- Advertisement -

या प्रकरणात संजय राऊत यांना ईडी कोणत्याही क्षणी ताब्यात घेऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता, इथे विकासकामांची मोठी कारवाई करायची आहे, असे सांगत थेट प्रतिक्रिया देण्याच टाळले. ते पहाटे दिल्लीहून औरंगाबादेत दाखल झाले.

हेही वाचा – राज्यातील राजकीय सत्तानाट्यावर सुप्रीम कोर्टात आता 3 ऑगस्टला सुनावणी

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -