घरमहाराष्ट्रक्रिकेट खेळणाऱ्या मुलांना लाकडी दांडक्याने मारहाण; एकाची प्रकृती गंभीर

क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना लाकडी दांडक्याने मारहाण; एकाची प्रकृती गंभीर

Subscribe

या मारहानीत एका मुलाच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

अंबरनाथ तालुक्यातील द्वारली पाडा या गावात गोकुळ नगरी सोसायटीजवळ असलेल्या साई बाबा मंदिरजवळ काल मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास १० ते १२ वयोगटातील मुले क्रिकेट खेळत होती. यावेळी खेळतांना बॉल हरवला असतांना मुले बॉल शोधण्यासाठी बाजूला असलेल्या दत्ता म्हात्रे यांच्या तबेल्याजवळ गेली होती. मुलांचा आवाज एकूण म्हात्रे यांच्या तबेल्यात काम करणारा परशुराम लक्ष्मण चाळके ( ५२ ) हा इसम बाहेर आला.

दारूच्या नशेत मुलांना मारहान

दारूच्या नशेत बाहेर आलेल्या इसमाने लाकडी दांडक्याने बारा वर्षीय शुभ शर्माच्या डोक्याला मारहाण केली. यासोबतच शुभच्या मित्राला देखील दांडक्याने मारले. या घटनेत शुभच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून रक्तात्राव होऊ लागल्याने शुभचा भाऊ आणि आई यांनी त्याचे वडील चाळीस वर्षीय रमेश लालजी शर्मा यांना फोनवर ही घटना कळवली. त्यावेळी ते तातडीने घरी पोहचले आणि मुलगा शुभ याला कृष्णलीला हॉस्पिटल कल्याण येथे उपचारासाठी दाखल केले.

- Advertisement -

आरोपीवर गुन्हा दाखल

या संदर्भात रमेश यांनी हिल- लाईन पोलीस ठाण्यात आरोपी परशुराम चाळके यांच्या विरुद्ध तक्रार केली असता पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आरोपी परशुराम चाळके याने दारूच्या नशेत हे कृत्य केले असून त्याला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. त्याने ज्या लाकडी दांडक्याने मुलांना मारहाण केली तो दंडाही जप्त करण्यात आला आहे. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस नाईक विनोद पाटील यांनी दिली आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -