घरमहाराष्ट्रChitra Wagh On Thackeray: वांद्रे ते शेतीच्या बांधापर्यंत जायचेही...; चित्रा वाघ यांचा...

Chitra Wagh On Thackeray: वांद्रे ते शेतीच्या बांधापर्यंत जायचेही…; चित्रा वाघ यांचा ठाकरेंना टोला

Subscribe

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने गंगापूर येथील पंचायत समिती मैदानावर आज सोमवार (12 फेब्रुवारी) जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये 1 लाख रुपये दिले म्हणजे कुटुंबांचं कल्याण होत नाही.

मुंबई : निर्दयी सरकारला देशातील शेतकरी व त्यांच्या आत्महत्यांकडे पहायला वेळ नाहीत, शेतीमालाचे भाव सातत्याने घसरत असून, बळीराजा कर्जबाजारी होत आहेत. मोदी सरकारमध्ये हिंम्मत असेल तर संपूर्ण देशात निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करावी असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. या आव्हानाचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी समाचार घेतला आहे. तुम्ही कधी वांद्र्यापासून शेतीच्या बांधापर्यंत जायचेही कष्ट घेतले नाहीत अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. (Chitra Wagh On Thackeray Even going from Bandra to the farm dam Chitra Waghs advice to Thackeray)

- Advertisement -

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने गंगापूर येथील पंचायत समिती मैदानावर आज सोमवार (12 फेब्रुवारी) जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये 1 लाख रुपये दिले म्हणजे कुटुंबांचं कल्याण होत नाही. तर त्यांचं कुटुंब उघड्यावर पडतं. त्या शेतकऱ्याचे आई-वडील, बहीण-भाऊ, पत्नी आणि मुल-बाळं उघड्यावर पडतात. ही उघड्यावर पडलेली कुटुंब तुम्हाला (भाजपा) उद्या जाब विचारणार आहेत. या निर्दयी सरकारला देशातील शेतकरी व त्यांच्या आत्महत्यांकडे पहायला वेळ नाही. शेतीमालाचे भाव सातत्याने घसरत असून, बळीराजा कर्जबाजारी होत आहे. मोदी सरकारमध्ये हिम्मत असेल तर संपूर्ण देशात निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करावी असे आव्हान ठाकरे यांनी भाजपाला दिले. त्यांच्या या आव्हानावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा : Ashok Chavan : अशोक चव्हाणांबरोबर ‘हे’ आमदारही राजीनाम्याच्या तयारीत? काँग्रेसमध्ये घडमोडींना वेग

- Advertisement -

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलेल्या आव्हानाला उत्तर देताना चित्रा वाघ यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर पोस्टमध्ये लिहिले की, उद्धव ठाकरे तुम्ही कधी वांद्र्यापासून शेतीच्या बांधापर्यंत जायचेही कष्ट घेतले नाहीत. तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जेव्हा अवकाळी पावसाने शेती भुईसपाट केली, तेव्हा तुम्ही तत्काळ कर्जमाफीसाठी तयारही नव्हता.

हेही वाचा : Ashok Chavan : ‘आदर्श’सह बुलढाणा अर्बन कर्ज घाटोळा अशोक चव्हाणांची पाठ सोडेना; ‘हे’ आहे काँग्रेस सोडण्याचे खरे कारण!

पहिल्यांदा कर्जमाफीचं आश्वासन देऊन नंतर शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची पूर्ण तयारी तुम्ही केली होती. त्यावेळी तुमच्या मित्र पक्षाच्या अर्थमंत्र्यांनीही थातूर-मातूर कारणं सांगत कर्जमाफीच्या जबाबदारीतून हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर 2019 च्या हिवाळी अधिवेशनात तुम्हाला यावरून धारेवर धरलं होतं, हे विसरलात काय? देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला सळो की, पळो करून सोडलं म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकली. जी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या हक्काचीच होती, तिचं श्रेय कसलं घेताय तुम्ही असाही सवाल चित्रा वाघ यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -