घरताज्या घडामोडी१०० कोटी घोटाळा गृहमंत्री गायब, २५ हजार कोटी घोटाळ्यात कोणाचा नंबर?, चित्रा...

१०० कोटी घोटाळा गृहमंत्री गायब, २५ हजार कोटी घोटाळ्यात कोणाचा नंबर?, चित्रा वाघ यांचा सवाल

Subscribe

राज्यात कोरोना काळात १०० कोटी घोटाळा प्रकरण बाहेर आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री गायब झाले आता २५ हजार कोटींचा घोटाळा बाहेर आल्यामुळे कोणाचा नबंर लागणार असा खोचक सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. कोरोना काळात १०० कोटी रुपये वसूली करण्याचे आदेश तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले असल्याचा आरोप तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केली आहे. तर आता मुंबईतील रस्ते कंत्राटात २५ हजार कोटी रुपयांचे रस्ते बनवल्याचा अहवाल आला आहे. यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत मुंबई महानगरपालिका, शिवसेनेसह महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “मुंबईतील २५ हजार कोटींचे रस्ते बनले आहेत. पण रस्ते कोणते आहेत. खड्डे कुठे बुजवले. कंत्राटदार कोण आहे. याचा तपशील मुंबई महानगरपालिकेनं मांडलाच नाही. मुंबई महानगरपालिका कोणाला पाठीशी घालतेय. जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या ठग्ज ऑफ बीएमसीला कोण वाचवतंय?” असा सावल चित्रा वाघ यांनी केला आहे.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेने २५ हजार कोटी रुपयांचे रस्ते बनवले असल्याचे सांगितले आहे. परंतु कुठे खड्डे बुजवले आणि कोणाला कंत्राट दिला तसेच तो रस्ता कुठला? याबाबत माहिती दिली नाही. यामुळे हा २५ हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. राज्यात कोरोना काळात १०० कोटींचा घोटाळा बाहेर आला तेव्हा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख गायब झाले. आता २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा बाहेर आला आहे. आता नंबर कुणाचा ?? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट रात्री १२ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -