घरताज्या घडामोडीराजापूर हातिवले टोलनाका बंद; पालकमंत्री उदय सामंतांचा निर्णय

राजापूर हातिवले टोलनाका बंद; पालकमंत्री उदय सामंतांचा निर्णय

Subscribe

कोकणात रस्तेमार्गे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती कोकणातील राजापूर हातिवले येथे सुरू करण्यात आलेला टोल एका दिवसात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोकणात रस्तेमार्गे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती कोकणातील राजापूर हातिवले येथे सुरू करण्यात आलेला टोल एका दिवसात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा टोल नाका बंद करण्याबाबत आपण निर्णय घेतल्याचे स्वत: पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी माहिती दिली. (close the toll booth at rajapur hativale decision of guardian minister uday samant vvp96)

पालकमंत्री उदय सामंत यांच्या टोल नाका बंद करण्याच्या निर्णयानंतर बुधवारी संध्याकाळी 5 वाजता हा टोल नाका बंद करण्यात आला. विशेष म्हणजे जोपर्यंत तेथील स्थानिकांचे समाधान होणार नाही तोपर्यंत हातिवले टोल नाक्यावर वसुली सुरू केली जाणार नसल्याची भूमिकाही सामंतर यांनी घेतली.

- Advertisement -

राजापूर हातिवले टोल नाक्यापासून ११ किलोमीटर अलीकडे व पलीकडे टोल माफी मिळायला हवी अशी स्थानिकांची मागणी आहे आणि यावरून वाद निर्माण झाले आहेत. ते वाद आता समन्वयाने मिटत आले आहेत. ७५ टक्के काम पूर्ण झाल्यावर टोल सुरू करावा असा नॅशनल हायवेचा नियम आहे. पण तरीही हे काम ऐशी ते पंच्याऐशी टक्के पूर्ण झालेले असतानाही हा टोल सुरू करण्याला आपण परवानगी नाकारली आहे, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.

कोल्हापूर नॅशनल हायवे अथॉरिटीच्या व्यवस्थापनाखाली हातीवले येथील टोल नाका मंगळवारी सकाळपासून सुरू करण्यात आला होता. मात्र मुंबई गोवा हाय-वे चे काम अपूर्ण अवस्थेत असतानाही हा टोलनाका सुरू करण्यात आला. याला सर्वपक्षीय नेते व जनतेचा विरोध होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सावंत यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

दरम्यान या संदर्भात आपण राजापूर येथे १४ तारखेला रात्री नऊ वाजता बैठक घेण्यात येत असून या संदर्भात आपण ग्रामस्थांजवळ चर्चा करणार आहोत. यातून नक्की मार्ग निघेल. यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशीही माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.


हेही वाचा – बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांना मिळणार फेलोशिप; शिंदे सरकारचा निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -