घरCORONA UPDATEमहाविकास आघाडीचे मंत्री आणि मुख्य सचिवांमध्ये कोणताही संघर्ष नाही - मुख्यमंत्री

महाविकास आघाडीचे मंत्री आणि मुख्य सचिवांमध्ये कोणताही संघर्ष नाही – मुख्यमंत्री

Subscribe

मुख्य सचिव अजोय मेहता आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये झालेल्या वादावादीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सारवा सारव केली असून मंत्रिमंडळ बैठकीत कोणताच वाद झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री आणि मुख्य सचिव यांच्यामध्ये संघर्ष झाला, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण मंत्रिमंडळात अशा कोणताही वाद झाला नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तसेच बैठकीमध्ये असे काहीही झाले नसून, मंत्रिमंडळ बैठकीत सूचना येत असतात, काही विषय हे ऐनवेळी येतात, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिक बोलणे टाळले. दरम्यान राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे निवृत्तीनंतर सलग ९ महिने राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम करत आहेत. मात्र मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संबंधित खात्याच्या मंत्र्यांना विश्वासात न घेताच प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचे तीव्र पडसाद उमटले.

- Advertisement -

संबंधित मंत्र्याने Action घेतल्यानंतर आणि त्याला अनेक मंत्र्यांनी आपला विरोधाचा सूर मिसळल्यानंतर तो प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहतांवर आल्याचे वृत्त सगळीकडे प्रसारित झाले होते. दरम्यान या बातमी नंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी कवितेच्या माध्यमातून यावर भाष्य केले आहे.

महत्त्वाचा नाही, इथं शेतकऱ्यांचा सोनेरी गहू
मंत्री मोठा की, सचिव मोठा ते ठरवा आधी राऊ
शेतकऱ्याचा गहु पावसात भिजेल.. भिजला तर भिजू दे
मीच भुज”बळ”…मंत्री मंडळात माझा रुबाब मात्र टिकू दे
भाजीसह आंबा,कापूस, तूर, केळी उध्वस्त संत्री
महाराष्ट्रात प्रोटोकॉलसाठी भांडतात बघा कसे मंत्री!“, अशा शब्दात आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -