घरदेश-विदेश...म्हणून पुन्हा एकदा जामा मस्जिद बंद करण्याची शक्यता!

…म्हणून पुन्हा एकदा जामा मस्जिद बंद करण्याची शक्यता!

Subscribe

मंगळवारी दिल्लीत कोरोनाचे १ हजार ३६६ नवीन रुग्णांची नोंद

दिल्लीत कोरोनाचा वाढता कहर पाहता आता जामा मस्जिद पुन्हा एकदा बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भातील माहिती स्वत: शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी बुधवारी दिली. कोरोनामुळे मंगळवारी रात्री शाही इमामचे सचिव अमानुल्ला यांचे सफदरजंग रुग्णालयात निधन झाले, तेव्हा हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी दिल्लीत कोरोनाचे १ हजार ३६६ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून संक्रमित लोकांची संख्या ३१ हजार ३०९ वर पोहोचली आहे. तर ९० लोकांना आपला जीव कोरोनामुळे गमवावा लागला आहे.

बुखारी म्हणाले, ” अमानुल्लाह हे कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर त्यांना ३ जून रोजी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथेच त्यांनी प्राण सोडले.” शाही इमाम म्हणाले की, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या घटनांचा विचार करता ऐतिहासिक जामा मस्जिद पुन्हा बंद करण्याबाबत जनमत मागविण्यात आले आहे. तसेच ते म्हणाले, “सोशल मीडिया व इतर माध्यमातून जामा मस्जिद बंद करण्यावर लोक आपले मत देखील मांडत आहेत. आम्ही ते एक-दोन दिवसात पुन्हा बंद करु शकतो जेणेकरून‘नमाज’ पठण करणाऱ्यांची संख्या मर्यादित होऊ शकते. ”

- Advertisement -

सरकारने ‘अनलॉक -१’ अंतर्गत सवलत दिल्यानंतर दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर ८ जून रोजी जामा मशिद उघडली गेली होती. दरम्यान दिल्लीत कोरोनाचे प्रमाण सर्वाधिक असताना अशा वेळी मस्जिदींमध्ये जाणे योग्य नाही. यावेळी बुखारी म्हणाले, “मी इतर छोट्या छोट्या मस्जिद मधील लोकांना मशिदीऐवजी घरातच राहून नमाज करावे” असे आवाहन करण्यास सांगितले आहे.


रेल्वे व महापालिका प्रशासनातील असमन्वयामुळे हँकॉक पुलाचे काम रखडले
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -