घरCORONA UPDATEमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती?

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या एकूण संपत्तीची माहिती आज शपथपत्रात जाहीर केली. त्यानुसार उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची संपत्ती अंदाजे १२५ कोटी रुपये एवढी आहे. मुख्यमंत्री उ्द्धव ठाकरे हे राज्यपाल नियुक्त सदस्य होऊन विधान परिषदेत गेले असते तर त्यांना त्यांची संपत्ती सार्वजनिक करणे बंधनकारक नव्हते. मात्र २१ मे रोजी होणाऱ्या विधारपरिषेदच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी विधानभवनात अर्ज भरला. यावेळी अर्जासोबत त्यांनी शपथपत्रात त्यांची संपत्ती किती हे माहितीही दिली. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे किती संपत्ती आहे हे सावर्जनिक झाले आहे.

शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पत्नी रश्मी यांची एकत्रित स्थर स्थावर अशी सुमारे १२५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यात त्यांच्या ३ बंगल्यांचाही समावेश आहे. यातील मातोश्री हा बंगला वांद्रे पूर्व येथील कला नगर येथे असून त्याच्याच समोर नवीन बंगला उभारण्यात येत आहे. तसेच कर्जत येथे ठाकरे यांचे फार्म हाऊसही आहे. या सर्वसंपत्तीचा उल्लेख या शपथपत्रात करण्यात आला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या मालकिचे एकही वाहन नसल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

मुख्मंत्री उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे अनेक स्त्रोत असून यामध्ये विविध कंपन्यांमधील भागीदारी आणि त्यारुपातून मिळणारे डीविड्नट यांचाही समावेश आहे. तसेच आतापर्यंत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये २३ प्रकरणांची नोंद असून त्यातील १२ प्रकरणे बंद करण्यात आली आहेत. बाकिच्या तक्रारींची खासगी तक्रार म्हणून नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, सोमवारी उमेदवारी अर्ज भरताना त्यांची पत्नी रश्मी, मुलगा आमदार आदित्य व लहान मुलगा तेजसही उपस्थित होता. येणाऱ्या २१ मे रोजी ९ जागांसाठी विधानपिषदेची निवडणूक होणार आहे. यासाठी शिवसेनेकडून २ राष्ट्रवादीकडून २ काँग्रेसकडून एका उमेदवाराने अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीकडून ५ अर्ज भरण्यात आले आहेत. तर भाजपकडून ४ जणांनी अर्ज भरले आहेत. विधानपरिषदेची ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे संकेत असले तरी भाजपने अजून २ अर्ज भरले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १४ मे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -