घरताज्या घडामोडीरेल्वेतील गर्दी काही ओसरेना, मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची शक्यता!

रेल्वेतील गर्दी काही ओसरेना, मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची शक्यता!

Subscribe

मुंबईतील गर्दी कमी न झाल्यास मोठी पावलं उचलावी लागणार अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत. धार्मिक स्थळ, शाळा तसेच मुंबईतील गर्दीची ठिकाणं बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र तरीही मुंबईतील गर्दी काही प्रमाणातच कमी झाली आहे. ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. त्यामुळे मुंबईतील गर्दी कमी न झाल्यास मोठी पावलं उचलावी लागणार अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळावं असं आवाहन राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद मिळत आहे. पण, सरकारला अपेक्षित असा नाही. अजूनही लोकल आणि बसेसमध्ये गर्दी दिसून येत आहे. सार्वजनिक वाहतुकीवरील भार कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रसंगी कठोर निर्णय घेतले जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. आज मुख्यमंत्री १२.३० वाजता फेसबुक लाईव्हद्वारे सर्वांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

- Advertisement -

महाराष्ट्रात करोना बाधित रुग्णांची संख्या तीनने वाढून आता ५२ झाली आहे. काल राज्यात ४९ रुग्ण होते. मात्र मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळले आहेत. तसेच पाच रुग्णांची तब्येत बरी झाली असून ते निगेटिव्ह झाले आहेत, अशा पाच रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या पाच रुग्णांना थोडे दिवस घरीच क्वॉरंटाइन केले जाणार आहे. मात्र एकूण रुग्णांच्या संख्येतून या पाच जणांना वजा केले जाणार नाही, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांच्या आवाहनाला पाठिंबा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल देशाला संबोधित करत असताना २२ मार्च रोजी एक दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्याची सूचना दिली आहे. सोशल डिस्टन्स राखण्यासाठी अशाप्रकारचा कर्फ्यू आवश्यक आहे, असे सांगत मोदींच्या आवाहनाला राज्याने पुर्ण पाठिंबा दिला पाहीजे, असेही टोपे यांनी यावेळी सांगितले. तसेच आज (दि. २० मार्च) संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे पंतप्रधानांशी संवाद साधणार आहोत. प्रयोगशाळांमध्ये करोना चाचणीचे किट्स आणि व्हेटिंलेटरची संख्या वाढविण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे विनंती करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -