घरताज्या घडामोडीकरोनाच्या शंकेने डॉक्टरलाच ४ हॉस्पिटलने नाकारले, उपचाराला उशिर झाल्याने व्हेंटिलेरवर

करोनाच्या शंकेने डॉक्टरलाच ४ हॉस्पिटलने नाकारले, उपचाराला उशिर झाल्याने व्हेंटिलेरवर

Subscribe

जास्त ताप आणि श्वसनाचा त्रास एका जळगावच्या डॉक्टरलाच उपचार देण्यासाठी जवळपास ४ रूग्णालयांनी नकार दिल्याचे समोर आले आहे. डॉक्टरला करोना व्हायरसची लागण नाही याचा क्लिअरन्स आणा, मगच आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊ असे सांगत चारही खाजगी हॉस्पिटल्सने या डॉक्टरला उपचार नाकारले आहेत. अनेक ठिकाणी उपचारासाठी शोध घेतल्यानंतर अखेर डॉक्टरला जळगावच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संपुर्ण शोधात या रूग्णाची प्रकृती आता गंभीर झाली असून आता डॉक्टरला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.

करोना व्हायरच्या भीतीमुळे खाजगी हॉस्पिटल्सनेही याचा मोठा धसका घेतला आहे. पण जळगावच्या या डॉक्टरचा ना परदेशी प्रवासाचा पूर्वीचा इतिहास आहे, ना कोणत्याही करोनाच्या पॉझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कात हा रूग्ण आलेला नाही. हा डॉक्टर कोल्हापूरवरून भुसावळला परतला होता. त्यानंतर डॉक्टरचा ताप वाढू लागला. बुधवारी रात्री उशिरा ताप वाढल्याने तसेच श्वास घेण्यासाठी त्रास झाल्यानेच अखेर या डॉक्टरने हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी धाव घेतली. या डॉक्टरच्या संपुर्ण कुटुंबाने रात्रभर उपचारासाठी हॉस्पिटल्सचा शोध घेतला. डॉक्टरला करोना व्हायरस असू शकतो म्हणूनच संपुर्ण हॉस्पिटलमध्ये हा व्हायरस पसरू शकतो असे सांगत खाजगी हॉस्पिटल्सने त्याला उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. तब्बल तीन खाजगी हॉस्पिटलच्या दारातून या कुटुंबाने हटवण्यात आले. अखेर शासकीय रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रत्येक हॉस्पिटलने या डॉक्टरला एडमिट करून घेण्यासाठी मनाई केली. आमच्या पेशंटने कोणताही परदेशी प्रवास केला नाही. तो डॉक्टर कोणत्याही करोना पॉझिटीव्हच्या संपर्रकात आलेला नाही, असे सांगत कुटुंबाला सगळ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये नाकारण्यात आले. आमच कोणीच एकत नव्हत अशी प्रतिक्रिया कुटुंबाने दिली आहे. सकाळी ७ वाजता या डॉक्टरला जळगावच्या शासकीय रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे संपर्क साधल्याने शासकीय हॉस्पिटलमध्ये आम्हाला दाखल करून घेण्यात आल्याची माहिती या कुटुंबाने दिली. या रूग्णाला उशिरा उपचार मिळाल्याने आता रूग्णाची परिस्थिती खूपच गंभीर आहे. आम्ही आता रूग्णाची रक्ताची चाचणी केली आहे. पण करोना व्हायरसची चाचणी गरजेची नसल्याचे शासकीय हॉस्पिटलच्या अधिष्ठाता असलेल्या डॉक्टरने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -