घरताज्या घडामोडीसतर्क राहून मदतकार्य करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना

सतर्क राहून मदतकार्य करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना

Subscribe

मुंबई परिसर, कोकणातील जिल्हे तसेच कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने आढावा घेत असून त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी आणि नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती घेतली. कोरोनाशी मुकाबला सुरू असतानाच अतिवृष्टीत सतर्क राहून मदतकार्य करण्याची सूचना ठाकरे यांनी केली आहे.

गेले दोन दिवस मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने आजही जोरदार हजेरी लावली. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आज मदत आणि पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याकडून माहिती घेतली. तसेच कोकण विभागीय आयुक्त लोकेश चंद्र, मुंबई पालिका आयक्त इकबाल सिंह चहल यांच्याशीही चर्चा करून ठाकरे यांनी सूचना केल्या. भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी बोलून मुख्यमंत्र्यांनी पुढील हवामानाचा काय अंदाज असेल आणि कशी तयारी करता येईल, याविषयी चर्चा केली.

- Advertisement -

कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना सूचना

उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी येथील परिस्थितीची पुणे आणि कोकण विभागीय आयुक्तांकडून माहिती घेतली. पूरपरिस्थिती असल्यास त्या भागातील नागरिकांचे वेळीच स्थलांतर करावे. नागरिकांची गैरसोय होणार नाही हे पाहण्याचे निर्देश ठाकरे यांनी दिले.

रेल्वे प्रवाशांची सुटका करणाऱ्या जवानांचे कौतुक

परवा, बुधवारपासून ते काल सकाळी ८.३० वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे १६२.३ मिमी, कुलाबा ३३१.०८ मिमी पाऊस झाला.  अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पडलेली झाडे, विस्कळीत वाहतूक तसेच मदत कार्याविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. कुर्ला येथे झाड अंगावर पडून एक व्यक्ती जखमी झाला असून ठिकठिकाणी पडलेली झाडे, फांद्या युद्धपातळीवर दूर करण्यात आल्याचे  पलिकेने सांगितले. बुधवारी मस्जिद बंदर येथे दोन उपनगरीय रेल्वेमधून २९० प्रवाशाना यशस्वीरीत्या बाहेर काढणाऱ्या रेल्वे पोलीस दलाच्या आणि एनडीआरएफ जवानांचे ठाकरे यांनी कौतुक केले.

- Advertisement -

पाण्याचा निचरा, पडलेली झाडे काढण्यास प्राधान्य

मुंबई शहरात १५ ठिकाणी घरांच्या भिंती पडण्याच्या तक्रारी आल्या आहेत. ३६१ ठिकाणी झाडे, फांद्या पडल्या होत्या. ते तोडून रस्ता साफ करण्याचे काम सुरु आहे. हे  काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पेडर रोड ते केम्स कॉर्नर या मार्गावर संरक्षक भिंत पडल्याची घटना घडली असून त्याचीही माहितीही उद्धव ठाकरे यांनी घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -