घरमहाराष्ट्रसीमाप्रश्न सुटणार का? महाराष्ट्र-कर्नाटकातील वाद सोडवण्याकरता समन्वय बैठक

सीमाप्रश्न सुटणार का? महाराष्ट्र-कर्नाटकातील वाद सोडवण्याकरता समन्वय बैठक

Subscribe

Maharashtra Karnataka Border Conflict: हत्तींचा उपद्रव, गर्भलंग चाचण्या, शालेय दाखले याबाबतही चर्चा होणार आहे. या बैठकीला कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूरचे जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे सीमाभागातील बेळगाव, विजयपुरा, कलबुर्गी, आणि बिदरचे जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कोल्हापूर – अलमट्टी धरणांची उंची, हत्तींचा उपद्रव, गर्भलिंग चाचण्या, शालेय दाखले अशा विविध समस्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती जिल्ह्यांना भेडसावत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून या समस्यांवर तोडगा निघालेला नाही. मात्र, या समस्यांवर आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप केला आहे. त्यानुसार, या समस्या सोडवण्याकरता आज कोल्हापुरात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थारवचंद गहलोत यांची बैठक होणार आहे. या बैठकीत या समस्यांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. (Maharashtra Karnataka Border Conflict)

हेही वाचा औषधोपचार महागले तरी, एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून मिळतेय बिलांची तुटपूंजी रक्कम

- Advertisement -

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, या संघर्षावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातलं आहे. अनेक दशकांपासून सुरू असलेल्या या सीमाप्रश्नांवर तोडगा काढण्याकरता दोन्ही राज्यातील राज्यपालांनी बैठक घेण्याचे आदेश मोदींनी दिले आहेत. त्यानुसार, आज कोल्हापुरातील रेसिडन्सी क्लबमध्ये आंतरराज्य समनव्य बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.


कर्नाटकातील अलमट्टी धरणाचा फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना बसतो. अतिमुसळधार पावसात या धरणामुळे दोन्ही जिल्ह्यांत पूर येतो. धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने आणला होता. मात्र, महाराष्ट्र सरकारने या मागणीला विरोध केला. या विषयावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तर, हत्तींचा उपद्रव, गर्भलंग चाचण्या, शालेय दाखले याबाबतही चर्चा होणार आहे. या बैठकीला कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूरचे जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे सीमाभागातील बेळगाव, विजयपुरा, कलबुर्गी, आणि बिदरचे जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -