घरमहाराष्ट्रकाँग्रेसने सावरकरांचा वारंवार अपमान केलाय, राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात फडणवीस आक्रमक

काँग्रेसने सावरकरांचा वारंवार अपमान केलाय, राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात फडणवीस आक्रमक

Subscribe

गांधींच्या अशा वक्तवा्याचा आम्ही निषेध करत राहु. सावरकरांची प्रतिमा कधीच पुसू शकणार नाहीत, असंही फडणवीस म्हणाले. 

मुंबई – काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो आंदोलनादरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात खळबळजनक वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याचा समाचार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. राहुल गांधींना भारताचा आणि काँग्रेसचा इतिहासच माहित नाही, म्हणून ते असे वक्तव्य करत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच, राहुल गांधींच्या या वक्तव्याला उद्धव ठाकरे विरोध करणार का, असा सवालही फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – आरएसएस आणि सावरकरांनी पैशांसाठी इंग्रजांची मदत केली; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

- Advertisement -

‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना अपमानित करण्याचं काम काँग्रेसने जाणीवपूर्वक केलं आहे. ११ वर्ष अंदमानच्या कालकोठडीत काळ्या पाण्याची शिक्षा सावकरांनी भोगली. सावरकरांनी सर्वाधिक वेळ शिक्षा भोगली आहे. तसंच, स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी शिक्षा भोगली आहे. परंतु, सावरकरांचं वेगळेपण हे की अनेक क्रांतीकराकाना त्यांनी प्रेरणा दिली. क्रांतीची संपूर्ण चळवळ त्यांनी उभी करून इंग्रजांचा अत्याचार सहन करून अंदमानच्या कालकोठडीत भारतीय स्वातंत्र्याचा ते विचार करत होते. त्यांचीच काव्य लिहित होते. अशा सावरकारांचा अपमान राहुल गांधी करतात. कारण त्यांना इतिहासच माहित नाही. त्यांना काँग्रेसचा आणि भारताचा इतिहास माहीत नाही,’ असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

उद्धव ठाकरे निषेध करणार का?

- Advertisement -

राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध उद्धव ठाकरे करणार का? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. भारत जोडो की तोडो यात्रेत शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते पाठवणार आहेत का? या यात्रेत पाठवून राहुल गांधींच्या वाक्याचं समर्थन ठाकरे करणार आहेत का? असा प्रश्न फडणवीसांनी विचारला आहे. तसंच, गांधींच्या अशा वक्तवा्याचा आम्ही निषेध करत राहु. सावरकरांची प्रतिमा कधीच पुसू शकणार नाहीत, असंही फडणवीस म्हणाले.


राहुल गांधी काय म्हणाले?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी सध्या भारत जोड यात्रेवर आहेत. आज त्यांच्या यात्रेचा 31 वा दिवस आहे. शनिवारी कर्नाटकमधील तुमकुरू येथील मायासांद्रा येथून यात्रेला सुरुवात झाली. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी आरएसएस आणि वीर सावरकर यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावकर यांनी इंग्रजांना मदत केली, ज्यासाठी त्यांना पैसे मिळत होते. स्वातंत्र्यलढ्यात भाजप कुठेच नव्हता, म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र डागले. कर्नाटकमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी हा आरोप केला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -