घरमहाराष्ट्रआरएसएस आणि सावरकरांनी पैशांसाठी इंग्रजांची मदत केली; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

आरएसएस आणि सावरकरांनी पैशांसाठी इंग्रजांची मदत केली; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

Subscribe

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी सध्या भारत जोड यात्रेवर आहेत. आज त्यांच्या यात्रेचा 31 वा दिवस आहे. शनिवारी कर्नाटकमधील तुमकुरू येथील मायासांद्रा येथून यात्रेला सुरुवात केली. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी आरएसएस आणि वीर सावरकर यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावकर यांनी इंग्रजांना मदत केली, ज्यासाठी त्यांना पैसे मिळत होते. स्वातंत्र्यलढ्यात भाजप कुठेच नव्हता, म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र डागले. कर्नाटकमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी हा आरोप केला आहे.

स्वातंत्र्य लढ्यात भाजरप कुठेही नव्हता, भाजप ही वस्तुस्थिती लपवू शकत नाही, काँग्रेस आणि त्यांचे नेते स्वातंत्र्यासाठी लढले. आम्ही फॅसिस्ट पक्ष नाही. आमचा पक्ष संवादावर विश्वास ठेवतो. सध्या निवडणूक जिंकण्यासाठी संघ म्हणून काम करावे लागेल, हे आम्हाला माहीत आहे. असही राहुल गांधी म्हणाले.

- Advertisement -

यावेळी पीएफआयच्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, द्वेष पसरविणारा व्यक्ती कोण आहे, याने काही फरक पडत नाही, तो कोणत्या समुदायातून येतो यानेही काही फरक पडत नाही. द्वेष आणि हिंसाचार पसरवणे हे देशविरोधी कृत्य आहे. द्वेष आणि हिंसाचाराविरोधात आम्ही वारंवार लढू असही ते म्हणाले.

लोकव्यवहारावर हल्ला केला जात असल्याने आम्ही नव्या शिक्षण धोरणाला विरोधत करत आहोत. आमच्या इतिहासाचं विकृतीकरण केलं जात आहे. नव्या शिक्षण धोरणातून काही लोकांच्या हाती शक्ती एकवटण्याचा प्रयत्न आहे. ज्यातून आमची संस्कृती अशी विकेंद्रित शिक्षण प्रणाली आम्हाला हवी आहे, असही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

यावेळी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मला अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर काही बोलायचे नाही,. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठा लढणाऱ्या दोन्ही उमेदवारांची स्वत:ची भूमिका आहे तसेच त्यांचा स्वत:चा दृष्टीकोन आहे. कोणालाही रिमोट कंट्रोल म्हणणे हा अपमान आहे.


ब्राह्मणांनी पापक्षालन करावं का? ब्राह्मण महासंघाचा आक्षेप तर शरद पवारांची भूमिका काय?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -