घरअर्थजगतदिवाळीला सोने लकाकणार, चांदीही महागणार; जाणून घ्या बाजारभाव

दिवाळीला सोने लकाकणार, चांदीही महागणार; जाणून घ्या बाजारभाव

Subscribe

नवी दिल्ली – दसऱ्याच्या दिवशी अभूतपूर्व सोने खरेदी झाल्यानंतर आता सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमती ५३ हजार रुपये प्रति दहा ग्रॅम जाऊ शकते. त्यामुळे धनत्रयोदशीला गुंतवणूकदार सोनेखरेदीमध्ये किती गुंतवणूक करतात हे पाहावं लागेल. दरम्यान, चांदीच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत. तसंच, सोने-चांदीच्या किंमतीही वाढत आहेत. गेल्या महिन्यात सोन्याच्या किंमती कमी झाल्या होत्या होत्या. २४ कॅरेट सोनं ५० हजाराच्या आत आले होते. तर, २२ कॅरेट सोन्याची किंमत ४५ हजारापर्यंत पोहोचली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून सोनाच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. दुसरीकडे डॉलरची किंमतही मजबूत होत आहे. त्यामुळे येत्या दिवाळीपर्यंत सोन्या-चांदीच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचा दर प्रति तोळा ५३ हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर, चांदीचा भाव ६३ हजार प्रति किलो होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

तारीख         २४ कॅरेट सोन्याची किंमत
८ ऑक्टोबर           ५२२०० रु
७ ऑक्टोबर           ५२२०० रु
६ ऑक्टोबर           ५२२०० रु
५ ऑक्टोबर           ५२१०० रु
४ ऑक्टोबर           ५१६६० रु
३ ऑक्टोबर           ५१११० रु
२ ऑक्टोबर           ५०७३० रु
१ ऑक्टोबर           ५०७३० रु

हॉलमार्कचे दागिने खरेदी करा

- Advertisement -

सोने खरेदी करताना ग्राहकांनी हॉलमार्क पाहून सोने खरेदी करावी. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड हॉलमार्क असलेले सोने खरेदी केल्यास ते विक्री करतानाही ग्राहकांना सोन्याची योग्य ती किंमत मिळते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -