घरमहाराष्ट्रमनसुख हिरेन प्रकरणात भाजपचे कनेक्शन, स्पष्टीकरण देणार का?; सचिन सावंत यांचा भाजपला...

मनसुख हिरेन प्रकरणात भाजपचे कनेक्शन, स्पष्टीकरण देणार का?; सचिन सावंत यांचा भाजपला सवाल

Subscribe

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणात राष्ट्रीय NIA ने मंगळवारी सीएसटी येथून काळ्या रंगाची मर्सिडीज कार जप्त केली. एनआयएने या गुन्ह्यात जप्त केलेली ही तिसरी कार असून, या कारमधून पाच लाखा पेक्षा अधिक रक्कम आणि नोट काउंटिंग मशीन, काही कपडे आणि स्कॉर्पिओ गाडीचे दोन नंबरप्लेट जप्त करण्यात आले असल्याची माहिती एनआयए चे महासंचालक अनिल शुक्ला यांनी दिली आहे. दरम्यान, आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मर्सिडीज कारचा संबंध भाजपशी असल्याचं म्हटलं आहे. मनसुख हिरेन प्रकरणात भाजपचे कनेक्शन, यावर आता भाजप नेते स्पष्टीकरण देणार का? असा सवाल देखील सचिन सावंत यांनी केला आहे.

सचिन सावंत यांनी एक ट्विट करत मनसुख हिरेन प्रकरणात भाजपचं कनेक्शन असल्याचं म्हटंल आहे. सचिन सावंत यांनी काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये भाजयुमो ठाणे ग्रामीणचा सचिव कारसोबत असल्याचा फोटो आहे. हा फोटो शेअर करुन “मनसुख हिरेन प्रकरणात आता भाजपचे कनेक्शन, मनसुख हिरेन यांनी १७ फेब्रुवारीला वापरलेली मर्सडीज गाडी ही भाजपच्या ठाणे येथील एका पदाधिकाऱ्याच्या फोटोत दिसत आहे. यावर आता भाजप नेते स्पष्टीकरण देणार का?” असा सवाल सचिन सावंत यांनी केला.

- Advertisement -

फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सीडीआर दाखवत सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या जबाबाचा हवाला देत वाझे यांनी हिरेन यांची हत्या केली असल्याचंही फडणवीस म्हणाले होते. फडणवीस यांनी मिळवलेल्या सीडीआरवर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये, अशी विनंती केली आहे.

- Advertisement -

“कर्नाटक उच्च न्यायालयाच्या १५ मार्चच्या निर्णयाने आरोपीची खाजगी माहिती तिसऱ्या व्यक्तीला देणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल. देवेंद्र फडणवीसजी मिळालेल्या CDRचा स्त्रोत न सांगून व CDR स्वतः कडे ठेवून, ते २ आरोपींना पाठीशी घालत आहेत‌. त्यांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये विनंती,” असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.


हेही वाचा – एका एपीआयमुळे सरकार पडणार नाही – संजय राऊत


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -