घरदेश-विदेशRajiv Satav: पंचायत समिती सदस्य, खासदार ते देशपातळीवरील काँग्रेसचे आश्वासक नेतृत्व

Rajiv Satav: पंचायत समिती सदस्य, खासदार ते देशपातळीवरील काँग्रेसचे आश्वासक नेतृत्व

Subscribe

काँग्रेसचे खासदार राजीव सातवं यांचं आज रविवारी सकाळी पहाटे अकाली निधन झालं. वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील जहांगीर रुग्णाललयात अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव यांच्या जाण्याने काँग्रेसची अतोनात हानी झाली नसून त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरुन निघणारी नाही.

राजीव सातव हे राजकारणी कुटुंबातील होते. परंतु त्यांच्या वागण्यातून हे कधीच जाणवलं नाही. पंचायत समिती सदस्य, आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला. गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. राजीव सातव काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जायचे. काँग्रेसचे भविष्यातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. राजीव सातव यांचे निधन ही काँग्रेसची मोठी हानी आहे.

- Advertisement -

राजीव सातव यांचा जन्म २१ सप्टेंबर १९७४ साली हिंगोली जिल्ह्यातील मसोड, तालुका कळमनुरी येथे झाला. त्यांच्या आई, रजनी सातव या शरद पवारांच्या मंत्रिमंडळातील मंत्री होत्या. राजीव सातव यांनी आपलं शिक्षण पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयातून आणि आयएलएस लॉ कॉलेजमधून पूर्ण केलं. २००२ साली त्यांचा विवाह झाला आणि सध्या त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

राजीव सातव यांची राजकीय कारकिर्द

  • राजीव सातव २००२ रोजी हिंगोलीच्या कळमनुरी पंचायत समिती सदस्यपदी निवडून गेले.
  • २००७ रोजी ते हिंगोली जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्यांची कृषी व पशुसंवर्धन सभापती पदी नियुक्ती करण्यात आली.
  • त्यानंतर २००८ रोजी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले.
  • २००९ रोजी कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.
  • २०१० रोजी त्यांची महाराष्ट्र युवक काँग्रेसची जबाबदारी नंतर अखिल भारतीय युवक काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
  • २०१४ रोजी ते हिंगोली लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आणि १६ व्या लोकसभेचे सदस्य झाले.
  • मार्च २०१८ रोजी त्यांची गुजरात प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली.
  • २०१९ रोजी त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर नियुक्त झाली.

चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार

हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत १०७५ प्रश्न विचारत २०५ वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची ८१ टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -